‘ए सेन्चुरी..’मध्ये ड्रेसिंग रूममधील किस्से

By admin | Published: June 22, 2016 03:23 AM2016-06-22T03:23:39+5:302016-06-22T03:23:39+5:30

ज्या वेळी तो खेळपट्टीवर असायचा, त्या वेळी आॅफ साईडला मारलेल्या फटक्यांमुळे चाहत्यांना रोमांचित करायचा आणि आता भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश

Tales in the dressing room in 'A Century ..' | ‘ए सेन्चुरी..’मध्ये ड्रेसिंग रूममधील किस्से

‘ए सेन्चुरी..’मध्ये ड्रेसिंग रूममधील किस्से

Next

नवी दिल्ली : ज्या वेळी तो खेळपट्टीवर असायचा, त्या वेळी आॅफ साईडला मारलेल्या फटक्यांमुळे चाहत्यांना रोमांचित करायचा आणि आता भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश असलेला सौरव गांगुली लेखक म्हणूनही चाहत्यांना रोमांचित करेल, अशी आशा आहे. भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरणावर आधारित त्याचे एक पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती पडणार आहे. (वृत्तसंस्था)

कधीच पराभव
न स्वीकारण्याची वृत्ती जोपासणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने
सिनिअर क्रीडा पत्रकार गौतम भट्टाचार्यच्या साथीने आपले पहिले पुस्तक ‘‘ए सेन्चुरी इज नॉट इनफ’वाचकांसाठी सादर केले आहे.

ठाकूर यांच्या हस्ते बीसीसीआयच्या संमेलनाचे उद््घाटन
धर्मशाला : बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) स्टेडियममध्ये भारतीय बोर्डाच्या पहिल्या वार्षिक संमेलनाचे
उद््घाटन केले. ठाकूर
यांनी टिष्ट्वटरवर म्हटले, की ‘बीसीसीआयच्या पहिल्या वार्षिक संमेलनाची
सुरुवात करताना मला अभिमान वाटतो.’ बीसीसीआयच्या वार्षिक क्रिकेट संमेलनाला धर्मशाला येथे मंगळवारपासून प्रारंभ झाला. बीसीसीआयतर्फे आयोजित हे संमेलन
२१ ते २४ जून या कालावधीत होणार
असून, भविष्यातही अशा प्रकारचे संमेलन आयोजित होण्याची आशा आहे. यात स्थानिक क्रिकेट मजबूत करण्यावर लक्ष देण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के म्हणाले, ‘‘संमेलन आयोजित करण्यासाठी ही सर्वांत योग्य वेळ आहे. एका छतासाठी खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी चर्चा करण्याची ही योग्य संधी आहे.’’

 

Web Title: Tales in the dressing room in 'A Century ..'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.