टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीममध्ये ललिता, संजीवनी, प्रार्थना, हीना यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:27 AM2017-09-18T01:27:09+5:302017-09-18T01:27:21+5:30

क्रीडा मंत्रालयाने पुढील वर्षी होणा-या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) योजनेमध्ये आणखी १०७ खेळाडूंचा समावेश केला

Target's Olympic podium scheme includes Lalita, Sanjivani, Prayer and Heena | टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीममध्ये ललिता, संजीवनी, प्रार्थना, हीना यांचा समावेश

टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीममध्ये ललिता, संजीवनी, प्रार्थना, हीना यांचा समावेश

Next


नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने पुढील वर्षी होणा-या राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्कीम (टॉप्स) योजनेमध्ये आणखी १०७ खेळाडूंचा समावेश केला. या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळेल.
निवड झालेल्या १०७ खेळाडूंपैकी केवळ चार खेळाडूंची निवड २०२० आॅलिम्पिक स्पर्धेपर्यंत झाली आहे, तर अन्य खेळाडूंची राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेपर्यंत निवड करण्यात आलेली आहे. या यादीत १०७ खेळाडू जोडल्या गेल्यामुळे टॉप्स योजनेमध्ये समावेश असलेल्या खेळाडूंची संख्या १५२ झाली आहे. त्यात १९ दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे. १ सप्टेंबर रोजी टॉप्स योजनेसोबत जुळलेल्या समितीची बैठक झाल्यानंतर या खेळाडूंची निवड करण्यात आली. यापूर्वी जुलैमध्ये टॉप्स योजनेमध्ये समावेश असलेल्या खेळाडूंची संख्या ४५ झाली होती.
क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी अलीकडेच टॉप्स योजनेमध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना मासिक भत्ता म्हणून ५० हजार रुपये देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. आॅलिम्पिक सुवर्णपदकविजेता अभिनव बिंद्राच्या अध्यक्षतेखालील ही समिती क्रीडा मंत्रालयाला खेळाडूंच्या नावाची यादी सादर करते.
टोकियो आॅलिम्पिकपर्यंत निवड झालेल्या खेळाडूंमध्ये युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, ट्रॅक अँड फिल्ड अ‍ॅथलिट लिली दास (८०० व १५०० मीटर दौड), संजीवनी जाधव (५००० व १०,००० मीटर दौड) आणि तेजस्वी शंकर (उंच उडी) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
>अ‍ॅथलेटिक्स (१९) :
नीरज चोपडा, के. टी. इरफान, गणपती कृष्णन, मनीष रावत, अजय कुमार सरोज, अन्नू राणी, जी. लक्ष्मणन, ललिता बाबर, लिली दास, नयना जेम्स, ओमप्रकाश कराना, तेजिंदर पाल सिंग, पी. यू. चित्रा, पूर्णिमा हेमब्रम, संजीवनी जाधव, सुधा सिंग, स्वप्ना बर्मन, तेजस्विनी शंकर, व्ही. नीना.
>भारोत्तोलन (१३) :
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, एस. सतीश कुमार, मुथुपुंडी राजा, दीपक लाथर, रागल व्यंकट राहुल, विकास ठाकूर, अजय सिंग, जिजामग देरू, परदीप सिंग, खुमुकॅम संजीता चानू, मटास संतोषी, पूनम यादव.
>बॉक्सिंग (१३) : शिव थापा, विकास कृष्णन, मनोज कुमार, अमित कुमार, श्याम कुमार काका, सचिन, एस. सूरजबाला देवी, सोनिया लाथेर, एल. देवेंद्रो सिंग, कविंदर बिष्ट, गौरव बिधुडी, सुमित सांगवान, सतीश कुमार.
>कुस्ती (१२) : विनेश फोगट, साक्षी मलिक, संदीप तोमर, बजरंग पुनिया, प्रवीण राणा, सत्यव्रत कादियान, सुमित, ललिता, सरिता, ज्ञानेंद्र दहिया, हरदीप सिंग, हरप्रीत सिंग.
>वुशू (९) : उचित शर्मा, नरेंद्र ग्रेवाल, अरुणपमा देवी, बुद्ध चंद्र सिंग, संतोष कुमार सिंग, सनाटोम्बी देवी, यमनाम सनाथोई देवी, सूर्य भानु प्रताप, ज्ञान दास.
>पॅरा स्पोर्ट््स
(१९) :
अमित कुमार सरोहा, दीपा मलिक, देवेंद्र झाजरिया, करमज्योती, मारियप्पा थांगवेलू, राम पाल चहर, रिंकू हुड्डा, संदीप चौधरी, जयंती बेहरा, रोहित कुमार, शरद कुमार, सुंदर सिंग गुर्जर, वरुण सिंग भाटी, वीरेंद्र धनकड, अवनी लेखारा, पूजा अग्रवाल, रुबीना फ्रान्सिस, फारमान बाशा, सचिन चौधरी.
>स्क्वॅश (३) :
दीपिका पल्लीकल, ज्योत्स्ना चिनप्पा, सौरव घोषाल.
>तिरंदाजी (१६) : अतनु दास, दीपिका कुमारी, जयंत तालुकदार, सचिन, तरुणदीप राय, बॉम्बयलादेवी, लक्ष्मी राणी मंजी, मोनिका सरेन, अमनजित, अभिषेक वर्मा, सी. आर. सिरे, खुसू धायाल, दिव्या धायाल, ज्योती सुरेखा, त्रिशा देब, लिली चानू.
>सायकलिंग (५) : दबोरा हेरोल्ड, अलेना रेजी, सराज पी, रणजित सिंग, साहिल कुमार.
ज्युडो (४) : अवतार सिंग, कल्पनादेवी, विजय कुमार यादव, तुलिका मान.
जिम्नॅस्टिक्स (५) : दीपा कर्माकर, राकेश कुमार, आशिष कुमार, प्रणती नायक, अरुणा बुद्ध रेड्डी.
बॅडमिंटन (१०) : के. श्रीकांत, साई प्रणीत बी, एच. एस. प्रणय, अजय जयराम, पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, सिक्की रेड्डी, प्रणव सी, आश्विनी पोनप्पा, लक्ष्य सेन.
टेनिस (७) : युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, सुमित नागल, रोहन बोपन्ना, सानिया मिर्झा, प्रार्थना ठोंबरे, करमन कौर थांडी.
नेमबाजी (१७) : जोरावर सिंग, हीना सिद्धू, मैराज अहमद खान, शेराज शेख, अंगद वीर सिंह बाजवा, पूजा घाटकर, अपूर्वी चंदेला, मेघना सज्जनर, दीपक कुमार, रवी कुमार, गगन नारंग, कायनन चेनाई, अंकुर मित्तल, शपथ भारद्वाज, संग्राम दाह्या, जीतू राय, ओंकार सिंह.

Web Title: Target's Olympic podium scheme includes Lalita, Sanjivani, Prayer and Heena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.