टाटा स्टील बुद्धिबळ 2017 : भारताचा ग्रँडमास्टर अधिबन याने वेस्ली सो ला बरोबरीत रोखले
By admin | Published: January 21, 2017 03:11 PM2017-01-21T15:11:48+5:302017-01-21T15:13:25+5:30
पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना भारताचा ग्रँडमास्टर अधिबन याने वेस्ली सो बरोबरीत रोखले. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना पेंटेला हरिकृष्ण याला वॉएटशेक विरुद्ध डाव जिंकायची नामी संधी होती, पण ती निसटली
Next
>केदार लेले
लंडन, दि. २१ - पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना भारताचा ग्रँडमास्टर अधिबन याने वेस्ली सो बरोबरीत रोखले. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना पेंटेला हरिकृष्ण याला वॉएटशेक विरुद्ध डाव जिंकायची नामी संधी होती, पण ती निसटली आणि त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले!
अनिष गिरीने नेपोम्नियाची वर विजय मिळवला तसेच वीई ने रिचर्ड रॅपोर्ट वर विजय मिळवला. अनुक्रमे अरोनियन वि. मॅग्नस कार्लसन, एल्यानॉव वि. कॅराकिन आणि ल्युक फ़ॅन वेली वि. दिमित्री आंद्रेकिन यांच्यातील लढती बरोबरीत सुटल्या.
अधिबन वि. वेस्ली सो
पुन्हा एकदा जय्यत तयारीचा नमुना सादर करत अधिबन याने किंग्ज गँबिट पद्धत अवलंबून वेस्ली सो याला आश्चर्याचा धक्का दिला. अधिबन आणि वेस्ली सो यांना कुठलीही आघाडी न मिळाल्यामुळे डावात अखेरपर्यंत समानता दिसून आली. समसमान परिस्थितीत ३९ चालींनंतर उभयतांनी आपला डाव बरोबरीत सोडवला.
पेंटेला हरिकृष्ण वि. वॉएटशेक
पेंटेला हरिकृष्ण आणि वॉएटशेक यांच्यात झालेला प्रदीर्घ डाव ६७ चालीनंतर बरोबरीत सुटला. जाणकारांच्या मते अनुक्रमे ४८व्या चालीवर तसेच ५३व्या चालीवर पेंटेला हरिकृष्णला हा डाव जिंकायची संधी होती, पण दोन्ही वेळेस विजयाची ती निसटलीच! अखेर टाळता न येणारे शह देत पेंटेला हरिकृष्णने डाव बरोबरीत सोडवला.
सहाव्या फेरीअखेर गुणतालिका
1 वेस्ली सो - 4.5 गुण
2. कार्लसन, एल्यानॉव - 4.0 गुण प्रत्येकी
4. अरोनियन, गिरी, वीई - 3.5 गुण
7. हरिकृष्ण, आंद्रेकिन, कॅराकिन, वॉएटशेक - 3.0 गुण प्रत्येकी
11. अधिबान - 2.5 गुण
12. नेपोम्नियाची - 2.0 गुण
13. रॅपोर्ट - 1.5 गुण
14. ल्युक फॅन वेली - 1.0 गुण
शनिवार 21 जानेवारी 2017 रोजी - अशी रंगेल सातवी फेरी
सर्जी कॅराकिन वि. लेवॉन अरोनियन
वेस्ली सो वि. पॅवेल एल्यानॉव
वॉएटशेक वि. अधिबन
दिमित्री आंद्रेकिन वि. पेंटेला हरिकृष्ण
वुई वि. ल्युक फ़ॅन वेली
इयान नेपोम्नियाची वि. रिचर्ड रॅपोर्ट
मॅग्नस कार्लसन वि. अनिष गिरी