कामगिरीत सातत्य राखण्यास संघ उत्सुक
By admin | Published: May 9, 2016 12:02 AM2016-05-09T00:02:27+5:302016-05-09T00:02:27+5:30
गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलच्या नवव्या पर्वात आज सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहेत
मोहाली : गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेला किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलच्या नवव्या पर्वात आज सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मोहीम कायम राखण्यास उत्सुक आहेत.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पंजाब आणि बेंगळुरू हे दोन्ही संघ संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. उभय संघांनी शनिवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे.
स्पर्धेच्या या वळणावर उभय संघांसाठी कुठलीही चूक महागडी ठरू शकते. आव्हान कायम राखण्यासाठी उभय संघ कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
पंजाब संघासाठी मार्ग खडतर आहे. कारण बेंगळुरू संघात जागतिक क्रिकेटमधील दिग्गज आक्रमक फलंदाज आहेत. त्यात कर्णधार विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि शेन वॉटसन यांचा समावेश आहे. सोमवारी सर्वांची नजर कोहलीच्या कामगिरीवर राहील.
> उभय संघ यातून निवडणार
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), वरुण अॅरोन, अबु नेचिम, एस. अरविंद, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, यजुवेंद्र चहल, एबी डिव्हिलियर्स, प्रवीण दुबे, ख्रिस गेल, ट्रेनिस हेड, इक्बाल अब्दुल्ला, केदार जाधव, अक्षय कर्णेवार, सरफराज खान, विक्रमजित मलिक, मनदीप सिंग, हर्षल पटेल, लोकेश राहुल, परवेज रसूल, केन रिचर्डसन, सचिन बेबी, विकास टोकस, शेन वॉटसन, डेव्हिड विसे, ख्रिस जॉर्डन, तबरेज शम्सी.
किंग्स इलेव्हन पंजाब : मुरली विजय (कर्णधार), हाशिम अमला, मार्क्स स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, गुरकिरत सिंग, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, मोहित शर्मा, केसी करियप्पा, संदीप शर्मा, अनुरित सिंग, अरमान जाफर, कायल एबोट, फरहान बेहारडियन, ऋषी धवन, मिशेल जॉन्सन,
निखिल नायक, मनन व्होरा,
प्रदीप साहू, स्वप्निल सिंग आणि शार्दूल ठाकूर.