दिल्लीचे सांघिक यश

By admin | Published: May 3, 2017 06:47 AM2017-05-03T06:47:48+5:302017-05-03T06:47:48+5:30

दिल्ली संघाने बलाढ्य सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. दिल्लीच्या युवा फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे युवराज सिंहच्या दमदार

Team fame of Delhi | दिल्लीचे सांघिक यश

दिल्लीचे सांघिक यश

Next

आॅनलाईन लोकमत
दिल्ली, दि. 3 - दिल्ली संघाने बलाढ्य सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. दिल्लीच्या युवा फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे युवराज सिंहच्या दमदार अर्धशतकावर पाणी फेरले गेले. मोहम्मद शमीनेही या सामन्यात दमदार पुनरागमन केले. जखमी जहीर खानची अनुपस्थिती त्याने जाणवू दिली नाही. तर दिल्लीचा हंगामी युवा कर्णधार करुण नायर याला लय सापडली हे दिल्ली संघासाठी नक्कीच सुखावह आहे.
दिल्लीच्या संघाने सनरायजर्सला धक्का दिला. मात्र त्याचा फारसा फरक गुणतक्त्यात पडलेला नाही. हैदराबाद तिसऱ्या स्थानावर तर दिल्ली सहाव्या स्थानावर कायम आहे. दिल्लीचे गुण वाढले आहेत. त्यासोबतच दिल्लीचा उत्साह वाढवणारी बाब म्हणजे त्यांची अनुभवहीन फलंदाजी या सामन्यात दडपणात ढेपाळली नाही. संजू सॅमसन आणि कर्णधार करुण नायर यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. या दोघांनी ४० धावांची भागिदारी केली. संजू बाद झाल्यानंतर नायरने दडपण न घेता फटकेबाजी केली. त्याचा हरपलेला फॉर्म पुन्हा मिळाला ही दिल्ली संघाची जमेची बाब आहे. पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर नायर एका धावेवर खेळत असताना मोहम्मद सिराजच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याचा सोपा झेल सोडला. या जीवदानाचा त्याने पुरेपुर फायदा उचलला.
त्यासोबतच अखेरच्या काही षटकांत कोरी अँडरसनने फटकेबाजी केली.
त्याआधी हैदराबादच्या युवराज सिंह याने दमदार फटकेबाजी करत ७० धावा केल्या. युवराजनेही आपल्या या खेळीत नेत्रदीपक चौकार लगावले.
बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करणारा मोहम्मद शमी या सामन्यात सामनावीर ठरला. आपल्या स्विंगने त्याने फलंदाजांना त्रस्त केले. त्याने वॉर्नर आणि विल्यमसन हे महत्त्वाचे बळी घेत हैदराबादच्या धावगतीला रोखले.
अफगाणिस्तानचा युवा खेळाडू राशिद खान याला या सामन्यात एकही बळी मिळाला नाही. आयपीएलच्या या सत्रात राशिदला बळी न मिळण्याचा हा दुसरा सामना आहे. हे दोन्ही सामने त्याने दिल्ली विरोधातच खेळले आहेत.
आॅरेंज कॅपच्या शर्यतीत डेव्हिड वॉर्नर आघाडीवर आहे. दिल्लीच्या सामन्यानंतर त्याने १० सामन्यात ४८९ धावा केल्या आहेत. तर पर्पल कॅपच्या शर्यतीत भुवनेश्वर कुमार आघाडीवर आहे. त्याने १० सामन्यात २१ बळी घेतले आहेत.

Web Title: Team fame of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.