टीम इंडियाचे सहप्रशिक्षक शंकर बसू यांचा राजीनामा

By admin | Published: December 28, 2016 03:00 AM2016-12-28T03:00:42+5:302016-12-28T03:00:42+5:30

भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ अ‍ॅन्ड कंडिशनिंग प्रशिक्षक शंकर बसू यांनी बीसीसीआयकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला आहे. इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या

Team India colleague Shankar Basu resigns | टीम इंडियाचे सहप्रशिक्षक शंकर बसू यांचा राजीनामा

टीम इंडियाचे सहप्रशिक्षक शंकर बसू यांचा राजीनामा

Next

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे स्ट्रेंथ अ‍ॅन्ड कंडिशनिंग प्रशिक्षक शंकर बसू यांनी बीसीसीआयकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपविला आहे. इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
अद्याप उभय बाजूतर्फे राजीनाम्याबाबत कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण संघातील खेळाडू मोठ्या संख्येने दुखापतग्रस्त होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने बसू यांना निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे, पण बसू आपल्या निर्णयावर कायम आहेत. बसू भारतीय क्रिकेट संघासोबत जुळण्यापूर्वी स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल व ज्योत्स्ना चिनप्पा यांच्यासोबत काम करीत होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Team India colleague Shankar Basu resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.