टीम इंडियाची नजर पुन्हा ‘क्लीन स्वीप’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2016 12:14 AM2016-06-18T00:14:38+5:302016-06-18T00:14:38+5:30

वन-डे सामन्यांच्या मालिकेत सफाया केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आपल्या यंदाच्या मोसमाचा शेवट शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत

Team India eye again on 'Clean sweep' | टीम इंडियाची नजर पुन्हा ‘क्लीन स्वीप’वर

टीम इंडियाची नजर पुन्हा ‘क्लीन स्वीप’वर

Next

हरारे : वन-डे सामन्यांच्या मालिकेत सफाया केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आपल्या यंदाच्या मोसमाचा शेवट शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देऊन करण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत धोनी अँड कंपनीने ३-० ने विजय मिळविला. आता त्यांचे लक्ष्य टी-२० मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे.
केदार जाधव व मनीष पांडे यांच्यासारख्या खेळाडूंना २०१५ मध्ये येथे टी-२० मालिका खेळण्याचा अनुभव आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला त्यावेळी दुसऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत संपली होती. जगातील सर्वांत अनुभवी टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळी क्लीन स्वीप देण्याचा प्रबळ दावेदार आहे. या १५ सदस्यांच्या संघात फैज फझलचा अपवाद वगळता सर्व खेळाडू आयपीएल खेळतात.
उभय संघांच्या कामगिरीची तुलना करता धोनीला फलंदाजीमध्ये बदल करण्याची संधी आहे. मनदीप सिंग, जयंत यादव, जयदेव उनाडकट यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. धोनी संघाच्या संयोजनासह सलामी लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक आहे. त्यामुळे संघात अधिक बदल करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता कमी आहे. धोनीने फलंदाजीमध्ये स्वत:ला बढती द्यायला हवी. कारण, त्याला खेळताना बघण्याची इच्छा बाळगणाऱ्या येथील मोजक्या भारतीय चाहत्यांची वन-डे मालिकेत निराशा झाली. कारण, त्यावेळी कर्णधाराला फलंदाजी करण्याची गरजच भासली नाही.
के.एल. राहुल, मनीष पांडे, अंबाती रायडू आणि धोनी टी-२० मालिकेत खेळणार असल्याचे निश्चित आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी करुण नायर आणि फझल यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येईल. नायरने दोन वन-डेमध्ये डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्या लढतीत त्याने ३९ धावांची खेळी केली. फझलने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली.
नायरची टी-२० सामन्यांतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याने निलंबित राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांचे प्रतिनिधित्व करताना ६४ सामन्यांत १२२ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता १०५ चा स्ट्राइक रेट असलेल्या फझलला २०११ नंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. पंजाबच्या मनदीपला राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केदार जाधवही शर्यतीत आहे. त्याला एकही वन-डे खेळण्याची संधी मिळाली नाही. (वृत्तसंस्था)टीम इंडियाची नजर
पुन्हा ‘क्लीन स्वीप’वर
हरारे : वन-डे सामन्यांच्या मालिकेत सफाया केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आपल्या यंदाच्या मोसमाचा शेवट शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान संघाला ‘क्लीन स्वीप’ देऊन करण्यास उत्सुक आहे. वन-डे मालिकेत धोनी अँड कंपनीने ३-० ने विजय मिळविला. आता त्यांचे लक्ष्य टी-२० मालिकेतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे.
केदार जाधव व मनीष पांडे यांच्यासारख्या खेळाडूंना २०१५ मध्ये येथे टी-२० मालिका खेळण्याचा अनुभव आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला त्यावेळी दुसऱ्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत संपली होती. जगातील सर्वांत अनुभवी टी-२० कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावेळी क्लीन स्वीप देण्याचा प्रबळ दावेदार आहे. या १५ सदस्यांच्या संघात फैज फझलचा अपवाद वगळता सर्व खेळाडू आयपीएल खेळतात.
उभय संघांच्या कामगिरीची तुलना करता धोनीला फलंदाजीमध्ये बदल करण्याची संधी आहे. मनदीप सिंग, जयंत यादव, जयदेव उनाडकट यांच्यासारख्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. धोनी संघाच्या संयोजनासह सलामी लढतीत विजय मिळवण्यास उत्सुक आहे. त्यामुळे संघात अधिक बदल करण्यास प्राधान्य देण्याची शक्यता कमी आहे. धोनीने फलंदाजीमध्ये स्वत:ला बढती द्यायला हवी. कारण, त्याला खेळताना बघण्याची इच्छा बाळगणाऱ्या येथील मोजक्या भारतीय चाहत्यांची वन-डे मालिकेत निराशा झाली. कारण, त्यावेळी कर्णधाराला फलंदाजी करण्याची गरजच भासली नाही.
के.एल. राहुल, मनीष पांडे, अंबाती रायडू आणि धोनी टी-२० मालिकेत खेळणार असल्याचे निश्चित आहे. डावाची सुरुवात करण्यासाठी करुण नायर आणि फझल यांच्यापैकी एकाची निवड करण्यात येईल. नायरने दोन वन-डेमध्ये डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्या लढतीत त्याने ३९ धावांची खेळी केली. फझलने पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतकी खेळी केली.
नायरची टी-२० सामन्यांतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. त्याने निलंबित राजस्थान रॉयल्स व दिल्ली डेअरडेव्हिल्स संघांचे प्रतिनिधित्व करताना ६४ सामन्यांत १२२ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता १०५ चा स्ट्राइक रेट असलेल्या फझलला २०११ नंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. पंजाबच्या मनदीपला राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केदार जाधवही शर्यतीत आहे. त्याला एकही वन-डे खेळण्याची संधी मिळाली नाही. (वृत्तसंस्था)

प्रतिस्पर्धी संघ
भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), केएल राहुल, फैज फजल, करुण नायर, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदार जाधव, मनदीप सिंग, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरन, धवल कुलकर्णी, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट, जयंत यादव.
झिम्बाब्वे :- ग्रीम क्रेमर (कर्णधार), वुसी सिबांडा, सिकंदर रजा, एल्टन चिगुंबुरा, हॅमिल्टन मसाकाजा, वेलिंग्टन मसाकाजा, तेंडाई चतारा, चामू चिभाभा, डोनाल्ड तिरिपानो, माल्कम वॉलर, पीटर मूर, तपिवा मुफुजा, तिनोतेंदा मुतोम्बोदजी, रिचमंड मुतुम्बामी, तोराइ मुजाराबानी, ब्रायन चारी, नेविले मेजिवा, तिमीकेन मारुमा.

सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० पासून.

Web Title: Team India eye again on 'Clean sweep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.