टीम इंडिया ‘फ्रंट फुटवर’

By admin | Published: June 4, 2017 06:07 AM2017-06-04T06:07:58+5:302017-06-04T06:07:58+5:30

चॅम्पियन्स चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानचा संघ ‘रिबिल्ड’ होत आहे. काही नवे खेळाडू तर काहींच्या पुनरागमनामुळे

Team India 'Front Footer' | टीम इंडिया ‘फ्रंट फुटवर’

टीम इंडिया ‘फ्रंट फुटवर’

Next

- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)

चॅम्पियन्स चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. पाकिस्तानचा संघ ‘रिबिल्ड’ होत आहे. काही नवे खेळाडू तर काहींच्या पुनरागमनामुळे हा संघ नव्या दमात दिसतोय. अझर अली, जुनेद खान, मोहम्मद आमिर यांच्यासारखे महत्त्वपूर्ण खेळाडू त्यांच्याकडे आहेत. परंतु, कागदावर तुलना केली तर भारतीय संघच वरचढ आहे. कर्णधार विराट कोहली चांगला खेळतोय. शिखर धवनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. यापूर्वी, मनात भीती असायची की, पाकचे वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना त्रस्त करतील. परंतु, आता भारताकडेही चांगले गोलंदाज आहेत. ते सुद्धा पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. एक समस्या असू शकते ती म्हणजे ‘ओपनिंग’ची. या जोडीतील कॉम्बिनेशन अजून जुळलेले नाही. त्यामुळे भारतीय संघापुढे सलामी जोडीचा प्रश्न असेल. असे असले तरी भारतीय फलंदाजी चांगली आहे. ‘आॅलराउंडर’ चांगले आहेत. इतिहासातील प्रदर्शन पाहिले तर भारतीय संघ वरचढ ठरलेला आहे. २०१५ च्या विश्वचषकात आणि टी-२० विश्वचषकातही भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे भारताला ‘अ‍ॅडव्हॉटेन्ज’ आहे असे मला वाटते.
सुप्रसिद्ध इतिहासकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देत ‘तहलका’ निर्माण केला. जी समिती सर्वाेच्च न्यायालयाने स्थापन केली होती. ५-६ पानांच्या पत्रात गुहा यांनी काही गोष्टी नमूद केल्या. त्यात बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा भोंगळ कारभार, भारतीय क्रि केट हे दिग्गज खेळाडूंच्या प्रभावाखाली (सुपरस्टार संस्कृती) असून, कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांच्यावरही नाव न घेता तोफ डागली. हे सर्व प्रश्न २०-२५ वर्षांपासून गाजत आहेत. मात्र, यावेळी गुहा हे प्रशासकीय समितीचे सदस्य असल्याने या प्रश्नाकडे सर्वाेच्च न्यायालय गांभीर्याने घेईल. त्यामुळे पुढे काय घडते याकडे लक्ष असेल. त्यांची पूर्ण तक्रार बघितली तर प्रशासकीय समितीविरुद्ध आहे.
दुसरीकडे, विराट-कुंबळे यांच्यातील वादाचा फटका चॅम्पियन्स चषकावर पडणार काय? भारत-पाक सामन्यावरही त्याचा परिणाम होईल काय, हे सुद्धा पाहावे लागेल. पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध आहे. त्यांनतर पुढे होणारे सामनेही महत्त्वाचे आहे. कारण एका सामन्यामुळे तुम्ही स्पर्धा जिंकू शकत नाही. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. कुंबळे-विराट दोन्ही खेळाडू महान आहेत. त्यांच्यातील वाद बातचीत करून मिटायला हवा. तो मिटलेला नसावा, असे मला वाटते. पण त्याचा परिणाम प्रदर्शनावर होता कामा नये. कारण कुंबळे किंवा विराट हे संघाला एकटे जिंकून देऊ शकत नाहीत. आशा आहे, की भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेन. निश्चितपणे, टीम इंडिया मजबूत आहे.

Web Title: Team India 'Front Footer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.