टीम इंडियाला 'मेड इन चायना'चा आधार
By admin | Published: March 7, 2017 03:35 PM2017-03-07T15:35:59+5:302017-03-07T15:43:17+5:30
भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रायोजक मिळाला आहे. चिनच्या कंपनीने केला भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत करार
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रायोजक मिळाला आहे. चिनची मोबाइल निर्माती कंपनी OPPO मोबाइलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत करार केला आहे. पाच वर्षांसाठी हा करार करण्यात आला असून एप्रिल 2017 पासून याची सुरूवात होईल. बीसीसीआय आणि OPPO मध्ये 538 कोटींपेक्षा जास्तचा करार झाल्याचं वृत्त आहे.
सध्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने दुस-यांदा प्रायोजकत्वासाठी बोली न लावण्याचा निर्णय घेतला होता. स्टारसोबत 1 जानेवारी 2014 ला करार झाला होता. 31 मार्चला हा करार संपणार आहे. डिसेंबर 2013 मध्ये सहाराची स्पॉन्सरशिप संपल्यानंतर स्टार भारतीय संघाचे मुख्य स्पॉन्सर बनले होते.
का लावली नाही स्टारने बोली?
बीसीसीआय आणि आयसीसीमधील संबंध कटू होत असून भविष्यात त्याचा खेळावर परिणाम होईल असं स्टार इंडियाचे सीईओ उदय शंकर म्हणाले होते. त्यामुळेच दुस-यांदा बोली न लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापुर्वी डिजीटल मार्केटिंगमधील अनेक कंपन्यांनी स्पॉन्सरशीप घेण्याची तयारी दाखवली होती असं वृत्त आहे. स्पॉन्सरशीप घेण्यासाठी पेटीएम, रिलायन्स जिओ आणि आयडिया सेल्यूलर या कंपन्यांची इच्छा होती असं वृत्त याआधी आलं होतं.