टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर रवाना
By admin | Published: July 6, 2016 06:14 PM2016-07-06T18:14:06+5:302016-07-06T18:14:06+5:30
स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील १६ सदस्यांचा भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाली. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. ६ : स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील १६ सदस्यांचा भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी मुंबईहून रवाना झाली. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून हा दौरा पहिलाच असल्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. सर विवियन रिचडर््स मैदानावर २१ ते २५ जुलैदरम्यान भारत व वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना रंगेल. यानंतर किंग्स्टन येथील सबीना पार्कमध्ये ३० जुलै - ३ आॅगस्ट दरम्यान दुसरा सामना होईल. तर सेंट लुसीया येथील ग्रास आइलेट (९ -१३ आॅगस्ट) आणि टेस्ट पोर्ट आॅफ स्पेन (१८ - २२ आॅगस्ट) येथे अनुक्रमे तिसरा व चौथा कसोटी सामना होईल.
याआधी २०११ साली भारताने विंडीज दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाने १-० अशी बाजी मारली होती. दरम्यान, मुख्य सामन्यांपुर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार असून ९-१० जुलैला सेंट किट्स येथे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हनविरुद्ध सराव सामना खेळेल. तर यानंतर याच मैदानावर १४ - १६ जुलै दरम्यान दुसरा सराव सामना होईल. (वृत्तसंस्था)
.......................................
विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मुरली विजय, शिखर धवन, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, वृध्दिमान साहा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि स्टुअर्ट बिन्नी.
....................................