दिग्गजांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने जबरदस्त प्रगती केली

By admin | Published: September 20, 2016 05:23 AM2016-09-20T05:23:35+5:302016-09-20T05:23:35+5:30

दिग्गज खेळाडूंनी घेतलेल्या निवृत्तीनंतरदेखील टीम इंडियाने ज्या प्रकारे प्रगती केली आहे, ते पाहून मी प्रभावित झालो,’’ असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.

Team India made tremendous progress after the retirement of veterans | दिग्गजांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने जबरदस्त प्रगती केली

दिग्गजांच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाने जबरदस्त प्रगती केली

Next


नवी दिल्ली : ‘‘गेल्या काही वर्षांत संघातील दिग्गज खेळाडूंनी घेतलेल्या निवृत्तीनंतरदेखील टीम इंडियाने ज्या प्रकारे प्रगती केली आहे, ते पाहून मी प्रभावित झालो,’’ असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.
कपिल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, जगातील कोणत्याही संघाने आपल्या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर अशा प्रकारे शानदार पुनरागमन केलेले नाही. हे केवळ टीम इंडियानेच साध्य केले आहे. जर का एकाच वेळी संघातील दिग्गज खेळाडू निवृत्ती घेत असतील, तर त्या संघाला पुनरागमनासाठी किमान पाच ते सात वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्याच्या टीम इंडियाने केलेली प्रगती लक्षवेधी असून मी असे कधीही कोणत्याही संघाबाबत पाहिलेले नाही.’’
‘‘सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजनसिंग, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी यांनी एकामागोमाग निवृत्ती घेतली. यामध्ये धोनी
सर्वाधिक महत्त्वाचा ठरला. सध्या संघाचे नेतृत्व सांभळलेला कोहली एक सुपरस्टार असून तो आदर्श आहे,’’ असेही कपिल यांनी या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
>कोहली धोनीच्या तुलनेत एकदम वेगळा असून, तो खूप आक्रमक आहे. प्रत्येक कर्णधार आपल्या वेगळ्या विचारसरणीने येतो. कोहली असा खेळाडू आहे, जो प्रत्येक सामना जिंकू इच्छितो. त्याचे विचार सकारात्मक असून हे भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे.
- कपिल देव

Web Title: Team India made tremendous progress after the retirement of veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.