आयसीसी टेस्ट रँकींगमध्ये टीम इंडिया नंबर १
By admin | Published: August 17, 2016 05:04 PM2016-08-17T17:04:21+5:302016-08-17T17:04:21+5:30
आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. कोलंबो कसोटीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर १६३ धावांनी विजय मिळवताच भारताचे टेस्ट रँकिंगमध्ये पहिले स्थान निश्चित झाले.
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात ३-० असा विजय मिळवून ११२ गुणांसह भारताला आपले पहिले स्थान कायम राखता येईल. चौथी कसोटी भारताने अनिर्णित राखली तर, ११० गुणांसह भारताची दुस-या स्थानी आणि पराभव झाला तर, १०८ गुणांसह चौथ्या स्थानी घसरण होईल.
पाकिस्तान १११ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी अनिर्णित राखली तर, भारताची दुस-या स्थानावर घसरण होईल. पाकिस्तानने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर ३-० असा विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला १० गुण गमवावे लागले व त्यांची तिस-या स्थानी घसरण झाली.