टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

By admin | Published: March 25, 2016 01:59 AM2016-03-25T01:59:31+5:302016-03-25T01:59:31+5:30

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच

Team India play openly | टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

Next

- सौरव गांगुली लिहितो़...

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच स्तब्ध झाली असेल. खेळपट्टीवर जम बसलेले दोन फलंदाज असताना तीन चेंडंूत दोन धावा काढता न येणे, हे न पटण्यासारखे आहे.
दुसरा चौकार काढल्यानंतर त्यांनी केवळ एकेरी धाव काढायला हवी होती आणि धोनीने केलेल्या क्षेत्ररक्षणाची रचना पाहता ते सहज शक्य होते. त्यामुळे धावसंख्या बरोबरीत आली असती व धोनीला क्षेत्ररक्षकांना जवळ आणणे भाग पडले असते. शेवटच्या चेंडूपर्यंत हिमतीने झुंज दिल्याबद्दल भारतीय संघ, धोनी व पांड्याला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे.
स्पर्धेमध्ये अद्याप भारतीय फलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत, हे मात्र मान्य करायलाच हवे. भारताचे सामने जिथे झाले त्या तीनही खेळपट्ट्यांवरील फिरकी आश्चर्यजनक होती. चेंडू फिरकी घेईल, अशा खेळपट्ट्या बनवण्याच्या सूचना दिल्याचा संशय व्यक्त होत आहे, पण त्यात तथ्य नाही. कोलकाताच्या बाबतीत मी ठामपणे सांगतो, की पाऊस पडल्याने अतिरिक्त ओलाव्यामुळे चेंडू फिरकी घेऊ लागला. ग्राउंड्समननी फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या तयार करण्याच्या अतिउत्साहात कोरड्या खेळपट्ट्या तयार केल्या. त्यामुळे चेंडू इतका वळत होत असल्याचे मला वाटते. बुधवारी भारतीय फलंदाजीचा क्रम तात्पुरत्या स्वरूपाचा होता. रोहित व शिखरच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा होती, मात्र माझे मत वेगळे आहे. ते न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले होते आणि टी-२० क्रिकेटमध्ये असे होत असते. त्यांनी वृत्तपत्र वाचणे बंद करून मुक्तपणे खेळले पाहिजे. कदाचित खेळपट्टीमुळे ते मुक्तपणे खेळू शकत नसतील, पण मोहालीतील चांगल्या खेळपट्टीवर ही स्थिती बदलू शकेल. चांगल्या टणक खेळपट्ट्या फलंदाजांसाठी लाभदायक ठरू शकतील. भारताने विजय खेचून आणला, पण मला त्यांची कामगिरी फारशी प्रभावी वाटली नाही. घरच्या मैदानांवर विश्वचषक खेळणे
सोपे नाही, पण काही वेळा चाहत्यांच्या अपेक्षांमुळे कामगिरी उंचावते. त्यामुळे भारताने दबावाखाली न येता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या संघात काही उत्तम फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, फक्त त्यांनी मोकळेपणाने खेळणे गरजेचे आहे.
धोनीने सुरुवातीच्या फळीत फलंदाजीला यावे, असे मत
मी अनेकदा व्यक्त केले आहे.
तो सहाव्या क्रमांकावर येणे
पसंत करतो, मात्र युवराज व
रैना अद्याप चौथ्या क्रमांकावर क्षमतेनुसार खेळलेले नसल्याने कदाचित आॅस्ट्रेलियाविरुद्ध धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीतील
स्वत:चे स्थान बदलावे लागेल. कारण मधल्या फळीला प्रोत्साहनाची गरज आहे आणि धोनी भविष्यात पुन्हा सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो.
(गेमप्लान)

Web Title: Team India play openly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.