उद्यापासून टीम इंडियाचा सराव
By admin | Published: June 30, 2016 07:05 PM2016-06-30T19:05:15+5:302016-06-30T19:05:15+5:30
आगामी २१ जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी टीम इंडिया नवनिर्वाचित प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारपासून सराव करेल.
बंगळुरु : आगामी २१ जुलैपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी टीम इंडिया नवनिर्वाचित प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारपासून सराव करेल. बंगळुरुच्या केएससीए स्टेडियममध्ये होणाऱ्या या सराव शिबीरामध्ये गोलंदाजी व क्षेत्ररक्षणावर अधिक भर दिला जाईल.
पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणारी टीम इंडिया पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी दोन सराव सामने खेळेल. सेंट किट्स मैदानावर हे दोन्ही सराव सामने ९ - १० जुलै आणि १४ - १६ जुलै यादरम्यान खेळवले जातील. यानंतर पहिला कसोटी सामना २१ ते २५ जुलै दरम्यान होईल. तर दुसरा कसोटी सामना ३० जुलै - ३ आॅगस्ट, तिसरा कसोटी सामना ९ - १३ आॅगस्ट आणि चौथा कसोटी सामना १८ - २२ आॅगस्ट दरम्यान होईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने गुरुवारी एक पत्र देण्यात आहे. या पत्राद्वारे बीसीसीआयने सांगितले की, ह्यह्यटीम इंडिया केएससीए स्टेडियममध्ये सकाळी साडेनऊपासून सराव करेल. यानंतर दुपारी १२ वाजता संघाचा एक सदस्य प्रसारमाध्यमांशी संवाद साधेल.ह्णह्ण (वृत्तसंस्था)