टीम इंडियाला हवी रिफ्रेशमेंट
By admin | Published: February 2, 2015 03:21 AM2015-02-02T03:21:11+5:302015-02-02T03:21:11+5:30
आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़
एडिलेड : आॅस्ट्रेलियात सलग दोन महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आगामी वन-डे विश्वकचषकाच्या पार्श्वभूमीवर आपला थकवा मिटविण्यासाठी सध्या विश्रांती (रेस्ट) घेत आहे़
शुक्रवारी झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता़ यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संघातील खेळाडूंना थोड्या विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते़ यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शारीरिक आणि मानसिकरीत्या थकलेल्या खेळाडूंसाठी एडिलेट येथे एक आलिशान रिसोर्ट बुक केले आहे़
‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन महिन्यांपासून खेळाडू सतत क्रिकेट खेळत आहेत़ दोन महिने हा खूप मोठा कालावधी असतो़ त्यामुळे आम्ही खेळाडूंच्या भावना समजू शकतो़ आता टीम इंडियातील खेळाडू काही दिवस या रिसोर्टमध्ये विश्रांती करू शकतील़
हा अधिकारी पुढे म्हणाला, काही खेळाडूंनी मेलबोर्न आणि सिडनीतील आपल्या नातेवाइकांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे, तसेच जे खेळाडू भारतात येऊ इच्छितात त्यांनाही सूट देण्यात आली आहे; मात्र पूर्ण टीमला ५ फे ब्रुवारीपर्यंच्या सायंकाळपर्यंत एडिलेड येथे पोहोचावे लागणार आहे़ ज्या रिसोर्टमध्ये खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत तेथे खेळाडूंना पत्नी, तसेच मैत्रिणीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र विश्वचषकपूर्वी त्यांना आपल्या कुटुंबीयांची साथ सोडावी लागणार आहे़ (वृत्तसंस्था)