टीम इंडियाचा जमैकात कसून सराव

By admin | Published: July 28, 2016 06:02 PM2016-07-28T18:02:30+5:302016-07-28T18:02:30+5:30

कडक उन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबीना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला.

Team India's Jamaican practice | टीम इंडियाचा जमैकात कसून सराव

टीम इंडियाचा जमैकात कसून सराव

Next

ऑनलाइन लोकमत
जमैका, दि. २८ : कडक उन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबीना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला. सर्वच खेळाडूंनी सरावासह कठोर व्यायामदेखील केला. नियमित व्यायामानंतर खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत हात आजमावला. रिद्धिमान साहा याने विशेषत: यष्टिरक्षण करण्यास पसंती दिली.
मुरली विजय हा देखील जखमी अंगठ्यातून सावरलेला दिसला. त्याने हलका सराव केला.

डावखुरा फलंदाज शिखर धवन याने सर्वाधिक वेळ फलंदाजी केली. नंतर त्याने नेट्सवर थ्रो चे धडे घेतले. दुसऱ्या कसोटीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी तीन दिवसांआधीच हिरवीगार दिसत आहे. कठोर सरावामुळे वातावरणाशी एकरूप होण्यास मदत होईल, असे फिरकीपटू अमित मिश्रा याने सरावानंतर सांगितले. येथे आधीच्या तुलनेत अधिक कडक उन्ह आणि दमटपणा असल्याने मिश्राचे मत होते. सामना सुरू होण्यास वेळ असल्याने मैदान कर्मचारी गवत काढतात का, याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे

Web Title: Team India's Jamaican practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.