टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप!

By Admin | Published: August 8, 2014 02:39 AM2014-08-08T02:39:34+5:302014-08-08T02:39:34+5:30

अँडरसन आणि रवींद्र जडेजाच्या वादामुळे चर्चेत असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा शहाणपणा टीम इंडियाच्या चांगलाच अंगाशी आला.

Team India's top order flop! | टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप!

टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप!

googlenewsNext
>मँचेस्टर : अँडरसन आणि रवींद्र जडेजाच्या वादामुळे चर्चेत असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा शहाणपणा टीम इंडियाच्या चांगलाच अंगाशी आला. टीम इंडियाची टॉप ऑर्डर सपशेल फ्लॉप ठरली; शिवाय केवळ 8 धावांवर चार गडी बाद होण्याची नामुश्की टीम इंडियावर ओढावली. त्यानंतर अजिंक्य रहाणो, महेंद्रसिंग धोनी आणि आर. अश्विनने संघाला सावरले खरे, पण टीम इंडियाची मजल फक्त 152 धावांर्पयतच पोहोचली. 
 
1. तिस:या षटकात गंभीर चार धावांवर बाद झाला.
2. चौथ्या षटकात मुरली विजय शून्यावर बाद झाला.
3. चौथ्या षटकात विराट कोहली शून्यावर बाद झाला.
4. पाचव्या षटकात चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला.  
 
1952 साली हेडिंग्लेय कसोटीत इंग्लंडविरोधातच भारताची शून्य धावांवर चार गडी तंबूत अशी अवस्था झाली होती.  

Web Title: Team India's top order flop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.