टीम इंडियाचेच पारडे जड

By admin | Published: July 9, 2017 03:00 AM2017-07-09T03:00:32+5:302017-07-09T03:00:32+5:30

भारताविरुद्ध उद्या रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० लढतीसाठी वेस्ट इंडिजने तुफानी ख्रिस गेल याला संघात स्थान दिले

Team India's very good side | टीम इंडियाचेच पारडे जड

टीम इंडियाचेच पारडे जड

Next

किंग्जस्टन : भारताविरुद्ध उद्या रविवारी खेळल्या जाणाऱ्या एकमेव टी-२० लढतीसाठी वेस्ट इंडिजने तुफानी ख्रिस गेल याला संघात स्थान दिले तरी पाहुण्या संघाची बाजू भक्कम मानली जात आहे. कर्णधार विराट कोहली सलामीवीराची भूमिका बजावेल, अशी शक्यता आहे.
पाच सामन्यांची वन-डे मालिका ३-१ अशी जिंकणाऱ्या भारताला टी-२० जिंकून मालिकेचा शानदार समारोप करायचा आहे. यासाठी ख्रिस गेलच्या फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. खराब फॉर्म आणि जखमांशी झुंज देणारा गेल १५ महिन्यांनंतर राष्ट्रीय संघात परतला. आयपीएलमध्येहीतो अपयशी ठरला होता.
विंडीज संघ या प्रकारात सध्या विश्वविजेता असून संघात गेलसह मार्लोन सॅम्युअल्स, सुनील नारायण, सॅम्युअल बद्रीसारखे मॅचविनर आहेत. टी-२० चा तज्ज्ञ कार्लोस ब्रेथवेट कर्णधार असेल. मागच्या वर्षी फ्लोरिडात भारताविरुद्धच्या टी-२० त ४९ चेंडूंत शतक झळकविणारा एव्हिन लुईस याचादेखील संघात समावेश आहे. या लढतीसाठी भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत कोहली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. युवा ऋषभ पंतला दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाईल. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. कुलदीप यादवदेखील संघात असेल. तो वेगवान भुवनेश्वर व उमेश यादवनंतर फिरकीची बाजू सांभाळेल. विंडीजच्या आक्रमणाची भिस्त नारायण व बद्रीवर राहील. नारायण फलंदाजीत सलामीला खेळू शकतो.(वृत्तसंस्था)

उभय संघ असे...
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, युवराजसिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, दिनेश कार्तिक आणि मोहम्मद शमी.
वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, रोन्सफोर्ड बीटन, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, जेसन मोहम्मद, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेरोम टेलर, चाडविक वॉल्टन, केसरिक विल्यम्स.

स्थळ : सबीना पार्क, किंग्जस्टन, जमैका

सामन्याची वेळ : रात्री ९ वाजल्यापासून

Web Title: Team India's very good side

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.