' तो ' संघ राहिला रस्त्यावर... फोटो झाले वायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 11:09 PM2018-07-04T23:09:59+5:302018-07-04T23:10:57+5:30

विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ' तो ' संघ गेला होता. पण त्यांच्यावर वेळ आली ती रस्त्यावर राहण्याची.

'this' team was on the road ... The photo was viral | ' तो ' संघ राहिला रस्त्यावर... फोटो झाले वायरल

' तो ' संघ राहिला रस्त्यावर... फोटो झाले वायरल

googlenewsNext
ठळक मुद्दे विमानतळावर त्यांना सहा तास बंधकही बनवण्यात आलं. या सगळ्या हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या, तेही त्यांची चूक नसताना.

नवी दिल्ली : विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ' तो ' संघ गेला होता. पण त्यांच्यावर वेळ आली ती रस्त्यावर राहण्याची. विमानतळावर त्यांना सहा तास बंधकही बनवण्यात आलं. या सगळ्या हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या, तेही त्यांची चूक नसताना.


झिम्बाब्वेचा रग्बीचा संघ ट्युनिशियामध्ये विश्वचषकाची पात्रता फेरी खेळायला गेला होता. त्यावेळी त्यांची राहण्याची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये केली होती, ते निकृष्ठ दर्जाचे होते. त्यामुळे खेळाडूंनी हॉटेलपेक्षा रस्त्यावर राहणेच पसंत केले.

रस्त्यावर राहिल्यानंतरही झिम्बाब्वेच्या संघाच्या अडचणी काही संपल्या नाहीत. झिम्बाब्वेचा संघ ट्युनिशियाच्या विमानतळावर आला, त्यावेळी संघाच्या व्हीसा शुल्यासाठी ६०० डॉलर भरावे लागणार होते. त्यावेळी संघाकडे एवढे पैसे नव्हते, त्यामुळे त्यांना विमानतळावर बंधकही बनवण्यात आले होते. कालांतराने ही बातमी झिम्बाब्वेमध्ये समजली. त्यानंतर त्यांच्या संघटनांनी बरेच प्रयत्न करून आपल्या खेळाडूंना सोडवले.

Web Title: 'this' team was on the road ... The photo was viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.