Corona Virus : गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:26 PM2020-04-22T12:26:34+5:302020-04-22T12:29:34+5:30

कोरोना व्हायरसच्या सहाय्यता निधीत आणखी 3.3 लाखांची मदत केली आहे.

Teen Golfer Arjun Bhati Now Sells His Torn Shoes, Raises Rs 3.3 Lakh for Fight against Coronavirus svg | Corona Virus : गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी

Corona Virus : गोल्फपटू अर्जुन भाटीनं ठेवला आदर्श; ट्रॉफीनंतर आता 'खास' वस्तू विकून उभारला निधी

Next

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी पुढाकार घेऊन आपापल्या परीन आर्थिक मदत करत आहेत. सुनील गावस्कर ते विराट कोहलीपर्यंत अनेकांनी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला मदत केली आहे. पण, या सर्व सेलिब्रेटींमध्ये युवा गोल्फपटू अर्जुन भाटीची मदत वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. कोरोनाच्या या लढ्यात अर्जुननं खारीचा वाटा उचलण्यासाठी सुरुवातीला त्यानं जिंकलेल्या सर्व ट्रॉफींचा लिलाव करून निधी गोळा केला. आता त्यानं एका खास वस्तूचा लिलाव करून लाखोंचा निधी गोळा केला आहे.

कोरोना व्हायरसच्या सहाय्यता निधीत अर्जुननं आणखी 3.3 लाखांची मदत केली आहे. त्यानं 2018च्या कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत सहभाग घेताना जी बुटं घालून सहभाग घेतला होता, त्याचा त्यानं लिलाव केला आहे. ग्रेटर नॉयडाचा 15 वर्षीय खेळाडूनं यापूर्वी आपल्या 102 ट्रॉफी विकून 4.30 लाखांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला होता.


''2018च्या कनिष्ठ गोल्फ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत माझ्या पायाला प्रचंड वेदना होत होत्या. त्याही परिस्थितीती मी खेळलो आणि जिंकलो. त्या बुटांचा लिलाव केला आणि माझे काका वनीष प्रधान यांनी हे 3.30 लाखांत विकत घेतले. हा निधी मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे,'' असे अर्जुनने सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मानले आभार... 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...

संघात निवड झाली नाही, म्हणून रात्रभर रडला होता Virat Kohli!

गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार

 

Web Title: Teen Golfer Arjun Bhati Now Sells His Torn Shoes, Raises Rs 3.3 Lakh for Fight against Coronavirus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.