विजेंदरविरुद्धच्या लढतीसाठी दहा तास सराव

By admin | Published: July 17, 2017 12:32 AM2017-07-17T00:32:44+5:302017-07-17T00:32:44+5:30

विजेंदरसिंहला त्याच्या भूमीवर ‘धक्का’ देण्याच्या उद्देशाने डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मैमतअली

Ten hours of practice to fight against Vijender | विजेंदरविरुद्धच्या लढतीसाठी दहा तास सराव

विजेंदरविरुद्धच्या लढतीसाठी दहा तास सराव

Next

नवी दिल्ली : विजेंदरसिंहला त्याच्या भूमीवर ‘धक्का’ देण्याच्या उद्देशाने डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मैमतअली हा नॉकआऊट लढत जिंकण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी दहा तास सराव करीत असल्याचे सांगितले.
डब्ल्यूबीओ आशिया पॅसेफिक मिडलवेट चॅम्पियन विजेंदरचा सामना ५ आॅगस्ट रोजी मुंबईत चीनचा नंबर वन बॉक्सर मैमत अली याच्याशी होणार आहे. ही लढत दुहेरी विजेतेपदासाठी असेल.
मैमत अली म्हणाला, ‘मी प्रत्येक लढत गांभीर्याने घेतो आणि प्रत्येक वेळेस स्वत:ला त्या स्थितीत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. विजेंदरला मी पराभूत करील. मी त्याच्या चाली समजतो आणि त्यानुसार तयारी करीत आहे. विजेंदरला पहिल्या दोन अथवा तिसऱ्या फेरीत नॉकआऊट करण्यासाठी मी प्रत्येक दिवशी दहा तास सराव करीत आहे. ५ आॅगस्टला विजेंदर त्याच्या खऱ्या अर्थाने व्यावसायिक कारकीर्दीत सर्वात कडव्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करील.’ २0१५ च्या पदार्पणानंतर एकही लढत न गमावलेल्या भारतीय मुष्टियोद्ध्याला नमवण्यासाठी आपण व्यूहरचना आखली असल्याचेही त्याने सांगितले.
तो म्हणाला, ‘माझ्या संघाने त्याच्या सर्वच लढती पाहिल्या आहेत. विजेंदरवर जेव्हा ठोशांचा पाऊस पडेल तेव्हा तो थक्क होईल. मी लहान आहे, असा तो विचार करीत असेल; परंतु मी कोण आहे हे त्याला माहीत नाही.’
मैमतअली म्हणाला, ‘आमच्या दोघांच्याही नावावर पदार्पणानंतर एकही लढत न गमावण्याचा रेकॉर्ड आहे. नॉकआऊटमध्ये आमच्या दोघांचा रेकॉर्ड चांगला आहे, तथापि, दबाव त्याच्यावर असायला हवा. त्याला भारतात बॉक्सिंगचा बादशाहा समजले जाते. त्यानेही बादशाहाप्रमाणेच सुरुवात केली; परंतु आता या वेळेस माझे वर्चस्व असेल.’
यादरम्यान आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा अखिल कुमार आणि जितेंद्र यांच्यासह डब्ल्यूबीसी आशिया वेल्टरवेट चॅम्पियन नीरज गोयत, कुलदीप ढांढा, प्रदीप खरेरा आणि धर्मेंद्र ग्रेवाल यांच्याही लढती होतील. (वृत्तसंस्था)

Web Title: Ten hours of practice to fight against Vijender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.