टेनिस संघटनेचा सरकार, आयओएसोबत ‘पंगा’

By admin | Published: November 2, 2016 07:06 AM2016-11-02T07:06:22+5:302016-11-02T07:06:22+5:30

अ. भा. टेनिस संघटना नव्या अध्यक्षाची निवड करण्यास तयार आहे.

Tennis Association, IOSS 'Panga' | टेनिस संघटनेचा सरकार, आयओएसोबत ‘पंगा’

टेनिस संघटनेचा सरकार, आयओएसोबत ‘पंगा’

Next


नवी दिल्ली : अ. भा. टेनिस संघटना नव्या अध्यक्षाची निवड करण्यास तयार आहे. पण त्याआधी सरकारने आयओएसह सर्वच राष्ट्रीय क्रीडा महासंघांसाठी समान दिशानिर्देश लागू करावेत, यावर टेनिस संघटना ठाम आहे.
क्रीडा मंत्रालयाने टेनिस संघटनेला ९० दिवसांच्या आत अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले असून, त्यांची मान्यतादेखील गोठवली आहे. एआयटीएच्या अध्यक्षपदी अनिल खन्ना यांची निवड झाली होती. त्यांनी कार्यभार अद्याप स्वीकारला नसल्याने पद रिक्त आहे. इंदूर येथे झालेल्या विशेष आमसभेत खन्ना यांनी काही काळ कुठल्याही पदावर राहण्यास असमर्थता दर्शवीत अध्यक्षपद सांभाळण्यास नकार दिला होता. याआधी महासचिवपदावर काम केल्यानंतर त्यांना अध्यक्ष निवडण्यात आले होते. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत महासंघाने त्यांना आजीवन अध्यक्ष निवडले. सरकारचे मत असे की खन्ना यांचा अध्यक्षपदाचा पहिला कार्यकाळ क्रीडा संहितेच्या नियमाविरोधात आहे. टेनिस संघटनेने मात्र कुठल्याही नियमाचा भंग झाला नसल्याचे स्पष्ट केले.
एआयटीए महासचिव हिरामन चॅटर्जी यांनी सांगितले, की मी एसजीएम बोलावून अध्यक्षपदासाठी निवडणूक घेऊ शकतो, पण आधी सरकारने कुठले संशोधन करायचे आहे. याविषयीचे स्पष्ट
दिशानिर्देश पाठवावेत. क्रीडासंहिता, पदाधिकाऱ्यांचे वय आणि कार्यकाळ या अटींचे पालन करीत कारभार चालविणारा आमचा पहिला क्रीडा महासंघ आहे. (वृत्तसंस्था)

यासंदर्भात स्पष्टता निश्चित करण्यासाठी आम्ही क्रीडा मंत्रालयाला पत्र लिहिले. ते म्हणाले, की खन्ना अयोग्य असतील, असे सरकारचे मत आहे. पण नियमांत कुठेही ‘कूलिंग आॅफ पिरिएड’बाबत उल्लेख नाही. कोषाध्यक्ष आणि महासचिवांसाठी ही अट आहे. सरकारचे दिशानिर्देश स्पष्ट नाहीत. सर्वांसाठी हे नियम एकसमान असावेत. हे नियम आमच्यावरच लागू होणार असतील, तर अर्थ नाही. आम्ही सरकारसोबत पंगा घेऊ इच्छित नाही. मिळून काम करायचे आहे.
खन्ना यांना २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी एआयटीए अध्यक्ष निवडण्यात आले. त्याआधी ते दोनदा महासचिव होते. क्रीडासंहितेनुसार एखादी व्यक्ती दोनदा एकाच पदावर असेल आणि पुन्हा एखाद्या पदावर राहू इच्छित असेल, तर त्याला चार वर्षे विश्रांती घ्यावी लागते. एआयटीएचे मत असे की खन्ना हे पुन्हा महासचिव बनू शकत नाहीत, पण त्यांना जून २०१२ मध्ये अध्यक्ष निवडण्यात आले होते. महासचिव राहिलेली व्यक्ती :‘कूलिंग आॅफ पिरिएड’ आटोपल्याशिवाय अध्यक्ष बनू शकणार नाही, असा कुठेही नियम नाही.
खन्ना हे फार थोड्या फरकाने आयटीएफ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यांची विश्व संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आयटीएफ उपाध्यक्ष बनल्यापासून खन्ना यांनी मागच्या वर्षी अ. भा. टेनिस संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे ठरविले होते. कार्यकारी समितीने मात्र त्यांना असे करण्यापासून रोखले होते.

Web Title: Tennis Association, IOSS 'Panga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.