कसोटी क्रिकेट विस्तारले! आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा

By admin | Published: June 22, 2017 08:25 PM2017-06-22T20:25:37+5:302017-06-22T20:38:23+5:30

जेमतेम दहा सदस्यांचा परिवार असलेल्या कसोटी क्रिकेटला आता दोन नवे सदस्य मिळाले आहे. क्रिकेटमध्ये वेगाने प्रगती करत असलेल्या आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या

Test cricket expansion! Ireland and Afghanistan, Test status | कसोटी क्रिकेट विस्तारले! आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा

कसोटी क्रिकेट विस्तारले! आयर्लंड आणि अफगाणिस्तानला कसोटी संघांचा दर्जा

Next

 ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 22 - जेमतेम दहा सदस्यांचा परिवार असलेल्या कसोटी क्रिकेटला आता दोन नवे सदस्य मिळाले आहे.  क्रिकेटमध्ये वेगाने प्रगती करत असलेल्या आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघांना आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व  आणि कसोटी संघांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे कसोटी खेळणाऱ्या देशांची संख्या आता 12 वर जाणार आहे.  
अफगाणिस्तान आणि आयर्लंडच्या क्रिकेट संघांनी गेल्या काही वर्षात सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघटनांनी आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, लंडनमध्ये सुरू असलेल्या आयसीसीच्या बैठकीत आज दोन्ही संघांच्या सदस्यत्वाबाबत चर्चा झाली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि आयर्लंडला कसोटी दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

2000 साली बांगलादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल 17 वर्षांनी आयसीसीच्या कसोटी परिवाराचा विस्तार झाला. आहे. अफगाणिस्तान हा कसोटी दर्जा लाभलेला आशिया खंडातील पाचवा देश  ठरला आहे. तर आयर्लंडचा संघ कसोटी दर्जा मिळवणारा युरोपमधील दुसरा देश ठरला आहे. 

Web Title: Test cricket expansion! Ireland and Afghanistan, Test status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.