कसोटी क्रिकेट अनमोल

By Admin | Published: March 19, 2017 02:17 AM2017-03-19T02:17:50+5:302017-03-19T02:17:50+5:30

आज उभय संघांदरम्यान मैदानावर संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. कसोटी क्रिकेटचे भविष्य म्हणून याकडे बघता येईल. फटके खेळण्याच्या नादात अभेद्य बचावाचे

Test cricket priceless | कसोटी क्रिकेट अनमोल

कसोटी क्रिकेट अनमोल

googlenewsNext

- हर्षा भोगले लिहितो..

आज उभय संघांदरम्यान मैदानावर संघर्षपूर्ण खेळ अनुभवाला मिळाला. कसोटी क्रिकेटचे भविष्य म्हणून याकडे बघता येईल. फटके खेळण्याच्या नादात अभेद्य बचावाचे तंत्र हळूहळू लोप पावत असल्याचे भासत असताना, चेतेश्वर पुजाराने एखाद्या साधूप्रमाणे खेळपट्टीवर तळ ठोकत आज वर्चस्व गाजवल्यामुळे आयपीएलच्या युगातही कसोटी क्रिकेट अनमोल असल्याची प्रचिती आली.
साधारणपणे पुजाराचा स्ट्राईक रेट डाव जसा पुढे सरकतो तसा वाढत जातो, असा अनुभव आहे, पण शनिवारी मात्र तसे घडले नाही. आॅस्ट्रेलियाच्या दर्जेदार माऱ्यापुढे दुसऱ्या टोकाकडून एक-एक सहकारी माघारी परतत असल्याचा प्रभाव त्याच्या खेळीवर झाला. त्यामुळे ६ तास २० मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकणाऱ्या पुजाराने ३०२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १३० धावांची खेळी केली. त्याची ही खेळी सामना जिंकून देण्यापेक्षा सामना वाचविणारी असली तरी त्या खेळीचे महत्त्व कमी होत नाही. त्याने ही खेळी केली नसती तर मालिकेचा निकाल आज तिसऱ्याच दिवशी निश्चित झाला असता.
दोन दिग्गज फलंदाज फॉर्मात नसल्यामुळे भारतीय संघ या मालिकेत संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. कोहली व रहाणे यांचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. पुजारा व विजय यांनी सुरुवातीला डाव सावरला. आज केवळ २४० धावा फटकावल्या गेल्यामुळे ७०-८० च्या दशकाची आठवण झाली. पुजारा त्या काळातही संघाबाहेर राहिला नसता.
आॅस्ट्रेलियाने पॅट कमिन्सचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याने या खेळपट्टीवर आपली उपयुक्तता सिद्ध केली. गोलंदाजीत कमिन्ससारखा वेग असेल तर खेळपट्टीचे स्वरूप दुय्यम ठरते.
भारतीय संघाने चौथ्या दिवशीही जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करायला हवी. आॅस्ट्रेलियाची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप ९१ धावांची गरज आहे. विजयाबाबत विचार करण्यासाठी अद्याप बराच वेळ आहे. पहिल्या डावात आघाडी मिळवणे, हे पहिले लक्ष्य असायला हवे. भारतीय संघ पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरला आणि खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरली तर यजमान संघाला संधी राहील. अन्यथा वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरल्यामुळे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल. (पीएमजी)

Web Title: Test cricket priceless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.