आता कसोटी श्रीलंकन फलंदाजांची
By admin | Published: July 20, 2014 02:16 AM2014-07-20T02:16:56+5:302014-07-20T02:16:56+5:30
यजमान श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेर 1 बाद 110 धावांर्पयत मजल मारल्यामुळे कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली आह़े
Next
गाले : दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 370 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान श्रीलंकेने चौथ्या दिवसअखेर 1 बाद 110 धावांर्पयत मजल मारल्यामुळे कसोटी रंगतदार स्थितीत पोहोचली आह़े सामन्याच्या अखेरच्या दिवशी आफ्रिकेच्या गोलंदाजांची, तर लंकेच्या फलंदाजांची कसोटी असणार आह़े
श्रीलंकेला कसोटीच्या अखेरच्या दिवशी विजयासाठी आणखी 26क् धावांची गरज आह़े त्यांचे आणखी 9 गडी शिल्लक आहेत़ चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकेचा कुमार संगकारा 58 आणि कौशल सिल्वा 37 धावांवर खेळत होत़े सिल्वा आणि संगकारा यांनी दुस:या गडय़ासाठी 29़2 षटकांत 96 धावांची अभेद्य भागीदारी रचली आह़े
संगकाराने आपल्या खेळीत 89 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार लगावला, तर सिल्वाने 9क् चेंडूंत 5 चौकार खेचल़े त्याआधी श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज उपुल तरंगा (14) डेल स्टेन याच्या गोलंदाजीवर ङोलबाद होऊन माघारी परतला़
श्रीलंकेने सकाळी 9 बाद 283 या धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली़ आफ्रिकेच्या मोर्ने मोर्केलने रंगना हेराथला (19) बाद करीत लंकेचा डाव 292 धावांत संपुष्टात आणला़ आफ्रिकेकडून डेल स्टेनने 5, तर मोर्केलने 3 गडी बाद केल़े
आफ्रिकेने पहिल्या डावात 163 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली़ त्यानंतर पाहुण्या संघाने आपला दुसरा डाव 6 बाद 2क्6 धावांवर घोषित करताना लंकेसमोर विजयासाठी 37क् धावांचे आव्हान ठेवल़े श्रीलंकेकडून दिलरुवानने 4, तर रंगना हेराथने 2 गडी बाद केल़े (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : पहिला डाव : 9 बाद 455 (घोषित)़ दुसरा डाव : 6 बाद 2क्6 (घोषित). (फाफ डू प्लेसिस 37, ए़बी़ डिव्हिलियर्स 51, क्विंटन डी़ कॉक 36, रंगना हेराथ 2/84, दिलरुवान परेरा 4/79)़
श्रीलंका पहिला डाव : सर्वबाद 292़ दुसरा डाव : 32 षटकांत 1 बाद 11क़् (उपुल थरंगा 14, कौशल सिल्वा नाबाद 37, कुमार संगकारा नाबाद 58़, डेल स्टेन 1/18)़