साक्षीला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 11:25 PM2018-09-17T23:25:39+5:302018-09-17T23:26:01+5:30
सुशीलची अनुपस्थिती; जखमी सरिताची कुस्ती चाचणीतून माघार
नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयशी ठरलेली महिला मल्ल साक्षी मलिक हिची चाचणीविना विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय पथकात निवड झाली. बुडापेस्ट येथे २० ते २८ आॅक्टोबर या कालावधीत विश्व स्पर्धेचे आयोजन होईल.
६२ किलो वजन गटातील प्रतिस्पर्धी जखमी सरिता मोर अनुपस्थित राहिल्याने साक्षीला संघात स्थान मिळाले. दुहेरी आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने मात्र खराब कामगिरीमुळे चाचणीकडे पाठ फिरविली.
साक्षी यंदा खराब फॉर्मचा सामना करीत असून २०१८ च्या राष्टÑकुल स्पर्धेत तिला कांस्यवर समाधान मानावे लागले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार बजरंग(६५ किलो), विनेश फोगाट(५० किलो), यांच्या गटात चाचणीचे आयोजन होणार नाही. चौथ्या स्थानासाठी ५३ किलो महिला गटात रितू फोगाट आणि पिंकी यांच्यात चाचणीचे आयोजन होईल.
‘साक्षी मलिकला सरिताविरुद्ध खेळायचे होते, पण गुडघ्याच्या दुखण्यामुळे तिने माघार घेतली. रितूने तुर्कस्थानच्या आंतरराष्टÑीय स्पर्धेत ५० किलो गटात भाग घेतला होता. पण ती ५३ किलो गटात उत्कृष्ट लढत देऊ शकेल, असा विश्वास असल्याने रितू आणि पिंकी यांच्यामध्ये राष्टÑीय प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्या निगराणीमध्ये लखनौ येथे लढत घेतली जाईल. पुढच्या पिढीतील मल्लांचा शोध घेण्यासाठी २० ते ३० सप्टेंबर या कालावधीत २३ वर्षे गटाच्या राष्टÑीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन राजस्थानच्या चित्तोडगड येथे होईल,’ अशी माहिती तोमर यांनी दिली. (वृत्तसंस्था)