ठाकूर तो गयो ! अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट

By admin | Published: January 2, 2017 11:44 AM2017-01-02T11:44:45+5:302017-01-02T14:31:19+5:30

सर्वोच्च न्यायलयाने कडक कारवाई करत अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयच्या प्रमुख पदावरुन हटवलं आहे

Thakur went! Anurag Thakur out of BCCI | ठाकूर तो गयो ! अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट

ठाकूर तो गयो ! अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - सर्वोच्च न्यायलयाने कडक कारवाई करत अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयच्या प्रमुख पदावरुन हटवलं आहे. लोढा समितीच्या शिफारसी लागू न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांच्यासोबतच बीसीसीआय सचवि अजय शिर्केनाही पदावरुन हटवण्यात आलं आहे. तुमच्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर यांच्याकडे केली असून उत्तर मागितलं आहे. 18 जुलै 2016 रोजी आपण दिलेल्या आदेशाचं अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांनी पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 19 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
 
 
हे होणारच होतं, आणि झालं आहे. आम्ही सर्वोच्च न्यायलयात तीन अहवाल सादर केले होते, मात्र तरीही शिफारसी लागू केल्या गेल्या नाहीत. एकदा सर्वोच्च न्यायलयाने शिफारशी मान्य केल्यावर त्या लागू झाल्या पाहिजेत. प्रशासक येतात आणि जात असतात, पण हे खेळाच्या फायद्यासाठी महत्वाचं असल्याचं जस्टीस लोढा बोलले आहेत. 
 
 
सुप्रीम कोर्टाने थेट अध्यक्षांना हटवल्यामुळे, बीसीसीआयचा कारभार आता प्रशासकाची हाती सोपवण्यात आला आहे. कोर्टाने आता प्रशासक बीसीसीआयचा कार्यभार सांभाळेल, असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने फली नरिमन आणि  सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल गोपाल सुब्रमनियम यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली असून बीसीसीआय प्रशासकांच्या नेमणुकीसाठी चाचपणी करण्यास सांगितलं आहे. 
 
अमान्य शिफारशी -
 
- पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षे वयाची मर्यादा.
- उपशमन कालावधीसह नऊ वर्ष कार्यकाळावर मर्यादा
- एक राज्य, एक मत
- तीन सदस्यीय निवडसमिती

 

बीसीसीआयने मान्य केलेल्या शिफारशी -

- महालेखापाल प्रतिनिधीचा सर्वोच्च परिषदेत तसेच इंडियन प्रीमिअर लीग प्रशासकीय समितीत समावेश.
- कार्यकारिणी समितीऐवजी काही सुधारणांसह सर्वोच्च परिषदेची स्थापना. दिव्यांग आणि महिला क्रिकेटसाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती
- खेळाडूंच्या संघटनेची स्थापना आणि संघटनेच्या प्रतिनिधीला प्रमुख समित्यांमध्ये स्थान.
- आयसीसीच्या नियमांनुसार संलग्न सदस्यांना मतदानाचा अधिकार.
- पुदुच्चेरी संघटनेला बीसीसीआय सदस्यत्वाचा दर्जा.
- खेळाडू आणि सहयोगींकरता आचारसंहिता, उत्तेजकविरोधी आयोग, वंशभेदविरोधी आयोग, आयपीएलच्या पुढच्या हंगामाकरता भ्रष्टाचारविरोधी आयोग आणि नियमावली.
- खेळाडू आणि मध्यस्थ यांची नोंदणी.

Web Title: Thakur went! Anurag Thakur out of BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.