राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुणे तर मुलींमध्ये ठाणे अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 10:53 AM2018-11-27T10:53:50+5:302018-11-27T10:54:14+5:30
४६ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील मुले-मुली) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा, तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली.
पुणे : ४६ व्या कुमार-मुली (१८ वर्षांखालील मुले-मुली) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत कुमारांमध्ये पुण्याने नाशिकचा, तर मुलींमध्ये ठाण्याने पुण्याचा पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने पुणे खो-खो असोसिएशन संयोजित व आंबेगाव तालुका स्पोर्ट्स अॅकेडमी यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कुमारांच्या अंतिम सामन्यात पुण्याने नाशिकवर १८-१४ (१०-६, ८-८) असा ४ गुणांनी विजय संपादन करत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुण्याच्या राहुल मंडलने २:००, २:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, संदेश जाधवने २:००, १:३० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, वृषभ वाघने २:००, १:२० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, आदित्य गणपुलेने १:४०, १:०० मि. संरक्षण केले तर दिलीप खांडवीने १:४०, १:२० मि. संरक्षण करत चार गडी बाद केले, मयूर वनसेने २:३०, १:१० मि. संरक्षण केले, गणेश राठोडने १:३०, १:४० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला मात्र अजिंक्यपदाने पुण्यालाच वरले.
मुलींच्या अंतिम सामन्यात ठाण्याने पुण्याचा ०९-०८ (५-३, ४-५) असा अतिशय अतीतटीच्या सामन्यात एक गुणाने पराभव करत अजिंक्यपदाल काबिज केले. या सामन्यात ठाण्याच्या अश्विनी मोरेने ३:३०, २:२० मि. संरक्षण करताना १ बळी मिळवला, रेश्मा राठोडने २:२०, २:०० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले, वृत्तीका सोनवणेने नाबाद १:३०, १:२० मि. संरक्षण करताना २ बळी मिळवले व गीतांजली नरसाळेने १:४० मि. संरक्षण करत अतिशय अटीतटीच्या सामन्यात अजिंक्यपदाला गवसणी घातली तर पुण्याच्या स्नेहल जाधवने १:५०, ३:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले, ऋतुजा भोरने २:१० मि. संरक्षण करताना २ बळी घेतले व दिव्या जाधवने २:३०, १:५० मि. संरक्षण करताना जोरदार लढत दिली मात्र शेवटच्या क्षणाला विजयाने दान ठाण्याच्याच पदरी टाकले.
पुरस्कार
सर्वोत्कृष्ठ संरक्षक
राहुल मंडल (पुणे)
रेश्मा राठोड (ठाणे)
सर्वोत्कृष्ठ आक्रमक
संदेश जाधव (पुणे)
स्नेहल जाधव (पुणे)
सर्वोत्कृष्ठ अष्ठपैलू
दिलीप खांडवी (नाशिक)
अश्विनी मोरे (ठाणे)