थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:02 AM2018-05-31T03:02:03+5:302018-05-31T03:02:03+5:30

थाळीफेकीतील दिग्गज खेळाडू विकास गौडा याने १५ वर्षांच्या करिअरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.

Thane player Vikas Gowda retired | थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त

थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त

googlenewsNext

नवी दिल्ली : थाळीफेकीतील दिग्गज खेळाडू विकास गौडा याने १५ वर्षांच्या करिअरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्टÑकुलमध्ये थाळीफेकीत पदक जिंकणारा तो एकमेव पुरुष खेळाडू होता. चार वेळच्या आॅलिम्पियनचा निवृत्तीचा निर्णय आश्चर्यकारक नव्हताच. मागच्या वर्षी भुवनेश्वरमध्ये आशियाई चॅम्पियनशिपचे कांस्य जिंकल्यापासून विकास एकाही आंतरराष्टÑीय स्पर्धेत खेळला नव्हता. आगामी ५ जुलै रोजी तो ३६व्या वर्षांत पदार्पण करेल. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) स्वत:च्या टिष्ट्वटर पेजवर गौडाच्या निवृत्तीची घोषणा केली. त्याआधी विकासने महासंघाला पत्र लिहून निवृत्तीची माहिती दिली होती.
इंडोनेशियात होणाऱ्या आगामी आशियाडच्या महिनाभर आधीच विकासने निवृत्ती जाहीर केली आहे. काही महिन्यांपासून मनपसंत कामगिरी होत नव्हती. राष्टÑीय स्पर्धेत सहभागी होऊ न शकल्याने गोल्ड कोस्ट येथील राष्टÑकुल स्पर्धेतही तो सहभागी होऊ शकला नव्हता. मागच्या वर्षी आशियाई चॅम्पियनशिपआधी चाचणीसाठी तो अमेरिकेतून भुवनेश्वरला आला होता.

‘‘वारंवार विचार केल्यानंतर आणि अनेकांचा सल्ला घेतल्यानंतर निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. शरीराला आणखी वेदना देण्याची इच्छा नाही. आयुष्यातील पुढील वाटचालीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान होता. राष्ट्रीय संघाची नेहमीच उणीव जाणवत राहील. ’’
- विकास गौडा, थाळीफेकपटू.

विकास हा ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड अ‍ॅथलेटिक्ससाठी नेहमी प्रेरणा राहील. त्याचे करिअर शानदार होते. अनेक वर्षांची समर्पकवृत्ती आणि खडतर सराव याचे बोलके उदाहरण म्हणजे विकासने कमविलेली पदके. भारतीय अ‍ॅथलेटिक्सच्या सेवेबद्दल विकासचे आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा.’’
- आदील सुमारीवाला,
अध्यक्ष एएफआय

म्हैसूरमध्ये जन्मलेला विकास ६ वर्षांचा असताना कुटुंबासमवेत अमेरिकेतील मेरीलँडमध्ये स्थायिक झाला. त्याचे वडील माजी खेळाडू आणि १९८८च्या आॅलिम्पिकमध्ये राष्टÑीय
कोच होते.
२०१२ मध्ये विकासने नोंदविलेला ६६.२८ मीटर थाळीफेकीचा राष्टÑीय विक्रम अद्याप अबाधित आहे.
२०१३ आणि २०१५च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक त्याने जिंकले होते. २०१०च्या राष्टÑकुल स्पर्धेत रौप्य व २०१४च्या ग्लास्गो राष्टÑकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकले.
२०१० च्या आशियाडमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१४च्या आशियाडमध्ये विकास रौप्याचा मानकरी ठरला.
२००४२००४, २००८, २०१२ व २०१६ अशा चार आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा विकास २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये थाळीफेकीत अंतिम फेरीत पोहोचला होता.

Web Title: Thane player Vikas Gowda retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.