ठाण्याच्या देवकी राजपूत हिने पटकावला ''महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:39 PM2018-04-15T13:39:55+5:302018-04-15T13:39:55+5:30
इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला.
पंकज रोडेकर
ठाणे: हैदराबाद मधील एल.बी स्टेडियम येथे 11 ते 13 एप्रिल दरम्यान झालेल्या इंडियन रेसलिंग स्टाइल इंटरस्टेट रेसलिंग टूर्नामेंट (महिला कुस्ती) स्पर्धेत ठाण्याच्या देवकी देवीसिंग राजपूत यांनी 'महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब' पटकावला. सहा महिला प्रतिस्पर्धाकांना मातीत लोलुन गदा जिंकत, ठाणे जिल्ह्याच्या ठाणे शहर पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र-तेलंगाना केसरी ही मातीतिल (पुरुष व महिला) कुस्ती स्पर्धा पहिल्यांदाच खेळवण्यात आल्या. त्यामध्ये 55-65 या वजनी गटात खेलताना ठाणे शहर पोलीस दलाच्या देवकी यांनी सहा कुस्तीपट्टू यांच्याशी दोन हात करुन महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब जिंकत ठाण्यातील मुलीही खेलात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. या अजिंक्य पदामुळे ठाण्याला बहुदा पहिली,-वहीली गदा जिंकता आली आहे. विजेत्यांना गदा, पदक, प्रमाणपत्र, आणि रोख रक्कम देत गौरवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे देवकी हिने अशाप्रकारे केसरी किताबासाठी पहिल्यांदाच खेलुन गदा जिंकल्याने खूप आनंद झाल्याचे, तिचे वडील आणि प्रशिक्षक देवीसिंग राजपूत यांनी सांगितले.
"कुस्तीच्या आरखड्यात उतरणाऱ्या प्रत्येकाची आणि त्याच्या कुटुंबाची एकच इच्छा असते. गदा जिंकण्याची ती यानिमित्ताने पूर्ण झाली.आता जबाबदारी वाढली असून ऑलिम्पिक खेलणे हेच लक्ष् आहे. तसेच तेथे देशासाठी पदक जिंकायचे आहे."- देवकी राजपूत , महाराष्ट्र-तेलंगाना केसरी किताब विजेती
दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 17 ते 22 एप्रिल दरम्यान होणाऱ्या ऑल इंडिया पोलीस गेम या स्पर्धेची देवकी राजपूत तयारी करत असून त्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास देवकी यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केला आहे.