देशवासियांच्या प्रेमाने भारावून गेली हिमा, मानले सर्वांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 09:15 PM2018-07-13T21:15:15+5:302018-07-13T21:17:20+5:30
जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या हिमा दासने गुरूवारी इतिहास रचला आहे.
नवी दिल्ली : जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या हिमा दासने गुरूवारी इतिहास रचला आहे. या स्पर्धेत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. टॅ्क प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. तिच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून बॉलिवूड सेलेब्रिटी आणि सामान्य क्रीडा प्रेमीपर्यंत सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्याने भारावून गेलेल्या हिमाने ट्विटरवरून एक भावनिक मॅसेज पाठवला आहे. काय म्हणाली हिमा... पाहा हा व्हिडीओ...
— Hima Das (@HimaDas8) July 13, 2018