धक्कादायक! हॉटेल रुममध्ये गर्लफ्रेंडसोबतच्या सेक्सनंतर इंग्लंडच्या खेळाडूचा मृत्यू; महिलाही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:16 PM2022-07-18T13:16:48+5:302022-07-18T13:17:21+5:30
दिग्गज खेळाडूच्या निधनाने इंग्लंडमधील क्रीडा विश्व हादरून गेलं आहे.
दिग्गज खेळाडूच्या निधनाने इंग्लंडमधील क्रीडा विश्व हादरून गेलं आहे. इंग्लंडचा स्टार रग्बीपटू रिकी बायबी ( Ricky Bibey) याचा मृतदेह इटलीतील एका हॉटेलरुममध्ये सापडला. त्याच्यासोबत असलेली ४३ वर्षीय गर्लफ्रेंडही जखमी अवस्थेत सापडली आहे. Wigan आणि St Helens या क्लबने रिकीला श्रद्धांजली वाहिली आहे. ४० वर्षीय रिकी हा मँचेस्टरचा एककाळचा आघाडीचा आक्रमणपटू होता आणि २०१२ मध्ये त्याने निवृत्ती घेतली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार सेक्सनंतर त्याचे रात्री निधन झाले. रिकीचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तो आणि त्याची गर्लफ्रेंड सेक्स गेम खेळत होते आणि त्यादरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याचेही पोलिसांनी सांगितले. ही दोघंही नाईट आऊट करून रात्री हॉटेल रूममध्ये आले आणि सकाळी ८च्या सुमारात त्या महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. ती मदतीसाठी आवाज देत होती आणि तेव्हा ही घटना समोर आली.
जेव्हा हॉटेल कर्मचारी रुममध्ये पोहोचले तेव्हा रिकी मृतावस्थेत जमिनीवर पडला होता. रिकीच्या शरीरावर जखमांचे एकही निशाण नसल्याचे आणि तिसऱ्या व्यक्तिच्या समावेशाचे पुरावे सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ती महिलाही जखमी होती आणि प्रचंड रक्तस्त्राव होत होता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि रविवारी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.
We are desperately saddened to learn of the passing of their popular former prop forward Ricky Bibey (HN#1211) while on holiday in Italy. Ricky was only 40 years of age. Everyone at the club sends sincere condolences to his family and friends at this time. ❤️
— Leigh Centurions (@LeighCenturions) July 17, 2022