लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव? तिच्यासाठी पदकाचा मार्ग कसा होईल खुला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 05:55 PM2024-08-10T17:55:48+5:302024-08-10T18:32:15+5:30

लढत १-१  अशी बरोबरीत सुटली तरी भारतीय खेळाडूवर का आली पराभवाची वेळ

The fight was tied, Reetika Hooda Loses In Quarterfinals Of 76kg Freestyle Wrestling Can Still Fight For Bronze then why did Ritika lose? How will the path to a medal be open for her? | लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव? तिच्यासाठी पदकाचा मार्ग कसा होईल खुला?

लढत बरोबरीत सुटल्यावर रीतिकाच्या वाट्यालाच का आला पराभव? तिच्यासाठी पदकाचा मार्ग कसा होईल खुला?

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटच्या पदकाची आस असलेल्या महिला कुस्तीपटू रीतिका हुड्डा हिचा उपांत्य पूर्व सामन्यात पराभव झाला. महिला गटातील ७६ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकरात भारताच्या रीतिकानं  किर्गिझस्तानच्या मेडेट काइझी एइपेरी हिला तगडी झुंज दिली.

आघाडी घेण्यात रितिकानं मारली होती बाजी

किर्गिझस्तानच्या तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध रंगलेल्या उपांत्य पूर्व लढतीत रीतिकानं १ गुण मिळवत आघाडी घेतली होती. पण शेवटी तिने १ गुण गमावला. ज्यामुळे तिच्यावर पराभूत होण्याची वेळ आली. कारण ही लढत १-१  अशी बरोबरीत सुटली.

दोघींचे गुण समान असूनही  तिच्या प्रतिस्पर्धकाला विजेता कसे घोषित करण्यात आले असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.एवढेच नाही तर जरी ती उपांत्य फेरीत प्रवेश करण्यास अपयशी ठरली असली तरी अजूनही तिच्यासाठी पदक कमावण्याची संधी आहे. तेही आपण जाणून घेऊयात 

सामना टाय झाल्यामुळे या नियमामुळे फसला डाव

फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात पहिल्या दोन मिनिटांत दोन्ही खेळाडू गुण मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर कुस्ती निकाली काढण्यासाठी आणि खेळात आक्रमकता आणण्यासाठी  पॅसिव्हिटी नियमाचा (Passivity Rule) वापर केला जातो. या नियमानुसार, कमी आक्रमकता दाखवणाऱ्या खेळाडूला 30 सेकंदात गुण कमावयचा असतो. रीतिकाच्या प्रतिस्पर्धीनं हाच डाव साधला. शेवटचा गुण मिळवत तिने पुढच्या फेरीत प्रवेश केला. 

 रेपचेजच्या माध्यमातून पदकाचा मार्ग होऊ शकतो खुला   

कुस्तीमधील रेपचेज नियम हा स्पर्धकाला पुन्हा एक संधी निर्माण करून देणारा आहे. जर रीतिकाला ज्या प्रतिस्पर्धीनं पराभूत केलं ती अंतिम फेरीत पोहचली तर रेपचेजच्या माध्यमातून रीतिकाला कांस्य पदक पटकवण्याची एक संधी निर्मा्ण होईल. याआधी सुशिल कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या भारतीय कुस्तीपटूंनीही ऑलिम्पिकमध्ये  रेपचेजच्या माध्यमातून मानाची स्पर्धा गाजवली आहे.  

काय आहे रेपचेजचा नियम?

कुस्ती स्पर्धेतील वेगवेगळ्या गटात अंतिम सामन्यात प्रवेश करणाऱ्या खेळाडूला कडवी झुंज देणाऱ्या दोन खेळाडूंनी रेपचेज राउंडमध्ये कांस्य पदक जिंकण्याची संधी असते. कुस्तीमध्ये दोन कांस्य पदके दिली जातात. ही दोन कांस्य पदक अंतिम फेरीत पोहचलेल्या स्पर्धकाला कडवी टक्कर देणाऱ्या खेळाडूला पदकाच्या शर्यतीत आणणारा आहे. 

 

 

 

Web Title: The fight was tied, Reetika Hooda Loses In Quarterfinals Of 76kg Freestyle Wrestling Can Still Fight For Bronze then why did Ritika lose? How will the path to a medal be open for her?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.