दुर्दैवी : २४ वर्षीय विश्वविक्रमी धावपटूच्या कारचा अपघात, कोच अन् तो जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 11:25 AM2024-02-12T11:25:19+5:302024-02-12T11:25:48+5:30
Kelvin Kiptum died : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टम याचे रविवारी वयाच्या २४ व्या वर्षी रस्ता अपघातात निधन झाले.
Kelvin Kiptum died : विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टम याचे रविवारी वयाच्या २४ व्या वर्षी रस्ता अपघातात निधन झाले. केनियाच्या धावपटूसह कारमध्ये असलेले प्रशिक्षक गेर्वाईस हकिझिमाना यांचाही एल्डोरेट-कप्तागट रोडवरील अपघातात मृत्यू झाला. किप्टम याने २०२३ मध्ये दमदार कामगिरी करताना स्पर्धक एलियूड किप्चोगेला कडवी टक्कर दिली होती आणि मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये किप्टमने ४२ किलोमीटरचे अंतर २ तास ३५ सेकंदार पार करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता.
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी केनियाच्या संभाव्या मॅरेथॉन संघामध्ये दोन खेळाडूंचे नाव होती आणि त्यापैकी एक किप्टम होता. केनियाचे क्रीडा मंत्री अबाबू नम्वाम्बा यांनी किप्टमला श्रद्धांजली वाहिली आहे.
किप्टन याचा अपघात रविवारी रात्री ११ वाजता झाला आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किप्टम हा गाडी चालवत होता आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी झाली आणि त्याच्यासह प्रशिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांसह एक महिला प्रवासीही होती आणि तिला दुखापत झाली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
किप्टमन वर्षाच्या सुरुवातीला लंडन मॅरेथॉनमध्ये २ तास ०१: २५ मिनिटांची वेळ नोंदवरून कोर्स रेकॉर्डसह विजय मिळवला आणि तो २०२३ चा वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले.