तब्बल 4 वर्षांनंतर WWE स्मॅकडाऊनमध्ये रॉक परतला; सुपरस्टारला टार्गेट करत दम दाखवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 01:51 AM2023-09-17T01:51:30+5:302023-09-17T01:52:42+5:30

द रॉक हा WWE चा सर्वात फेव्हरिट सुपरस्टार आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 35 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने रिंगमध्ये अंडरटेकरलाही हरवले आहे. 2002 च्या No way out मध्ये त्याने अंडरटेकरचा पराभव केला होता.

The Rock returns to WWE SmackDown after 4 years; Targeting the austin theory | तब्बल 4 वर्षांनंतर WWE स्मॅकडाऊनमध्ये रॉक परतला; सुपरस्टारला टार्गेट करत दम दाखवला!

तब्बल 4 वर्षांनंतर WWE स्मॅकडाऊनमध्ये रॉक परतला; सुपरस्टारला टार्गेट करत दम दाखवला!

googlenewsNext

WWE च्या सर्वोत्कृष्ट रेसलरपैकी एक आणि दिग्गज हॉलिवूड अॅक्टर ड्वेन द जॉन्सन म्हणजेच द रॉक पुन्हा एकदा WWE मध्ये परतला आहे. त्याची ही एन्ट्री चाहत्यांसाठी मोठा सरप्राईज होते. द रॉकची एंट्रन्स थीम वाजली, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित सर्वच जण चकित झाले. यानंतर त्यांनी द रॉक साठी चीअर करायला सुरुवात केली. जॉन सीनानंतर आता द रॉकही WWE मध्ये परतला आहे. चाहत्यांसाठी यापेक्षा आनंदाची बातमी काय असू शकते?

रॉक यापूर्वी सर्वात शेवटी 2019 मध्ये WWE मध्ये दिसून आला होता. तेव्हा WWE स्मॅकडाउनचे 20वे वर्ष होते. द रॉक जेव्हा-जेव्हा wwe मध्य परततो तेव्हा त्यामागे काहीना काही कारण नक्कीच असते. यावेळी त्याने एन्ट्री करतच ऑस्टिन थ्योरीला टार्गेट केले. ऑस्टिन थ्योरीने त्याला पुन्हा एकदा रेस्लिंगसाठी चॅलेन्ज दिले होते आणि रॉकनेही ते स्वीकारले.

रॉकने 5 ते 1 पर्यंत मोजायला सुरुवात केली, तेवढ्यात ऑस्टिनने त्याचा हात सोडला. रॉकला हे आवडले नाही आणि त्याने ऑस्टिनला उचलून खाली आदळले. यानंतर त्याने त्याची सर्वात आवडती मूव्ह देखील दिली.

महत्वाचे म्हणजे, द रॉक हा WWE चा सर्वात फेव्हरिट सुपरस्टार आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 35 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याने रिंगमध्ये अंडरटेकरलाही हरवले आहे. 2002 च्या No way out मध्ये त्याने अंडरटेकरचा पराभव केला होता.

Web Title: The Rock returns to WWE SmackDown after 4 years; Targeting the austin theory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.