गोष्ट फुटबॉलच्या चेंडूच्या उत्क्रांतीची, १९३० साली होते टी-मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 05:52 AM2022-11-28T05:52:32+5:302022-11-28T05:52:44+5:30
काळानुपरत्वे मानवाची जशी उत्क्रांती होत गेली, अगदी तसाच फुटबॉल विश्वचषकात वापरला जाणारा चेंडू कात टाकत गेला
काळानुपरत्वे मानवाची जशी उत्क्रांती होत गेली, अगदी तसाच फुटबॉल विश्वचषकात वापरला जाणारा चेंडू कात टाकत गेला. १९३० साली फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्वप्रथम हाताने शिवलेला चामड्याचा चेंडू वापरण्यात आला होता. त्यानंतर १९३४ च्या विश्वचषकात चामड्याऐवजी जाड कापडाच्या चेेंडूचा प्रयोग करण्यात आला. या दरम्यान विविध संशोधने सुरू होतीच. त्यानंतर १९५० च्या विश्वचषकात ‘एअर व्हॉल्व्ह’ बसवलेला चेंडू मैदानावर अवतरला.
पुढे १९८६ चा विश्वचषकापासून पूर्णपणे सिंथेटिक असलेला चेंडू वापरण्याची सुरुवात झाली. चेंडूच्या या उत्क्रांतीच्या टप्प्यात तंत्रात जसा बदल होत गेला तसे चेंडूचे नावही वेळोवेळी बदलले. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या अनुषंगाने आजपर्यंत या स्पर्धेत वापरण्यात आलेल्या विविध प्रकारच्या आणि नावांच्या चेंडूचा आढावा घेणे क्रमप्राप्तच...
१९३० उरग्वे - टिएन्टो, टी-मॉडेल
१९३४ इटली - फेडरल १०२
.......
.......
२०१८ रशिया - टेलस्टार मेच्टा
2022 कतार - अल रिहला