...तर "आयपीएल - 10"चे जेतेपद पुणे संघाकडे

By admin | Published: May 16, 2017 04:44 PM2017-05-16T16:44:49+5:302017-05-16T16:44:49+5:30

आयपीएल 10 च्या सत्रातील शेवटच्या काही लढती बाकी आहेत. मुंबई, पुणे, कोलकाता आणि हैदराबाद यांनी क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे.

... then the title of the IPL - 10 "Pune team | ...तर "आयपीएल - 10"चे जेतेपद पुणे संघाकडे

...तर "आयपीएल - 10"चे जेतेपद पुणे संघाकडे

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आयपीएल 10 च्या सत्रातील शेवटच्या काही लढती बाकी आहेत. मुंबई, पुणे, कोलकाता आणि हैदराबाद यांनी क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. या चार संघामध्ये मुंबई, कोलकाता आणि हैदराबादने दोनवेळा विजेपद पटकावले आहे. रायजिंग पुणे सुपरजाएंटने पहिल्यांच पहिल्या चार संघात स्थान मिळवले आहे. आयपीएलला सुरुवात झाल्यापासून नऊ वेळा गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या संघाने जेतेपदाला गवसणी घातल्याचा आगळावेगळा योगायोग आहे. फक्त एकवेळा 2016च्या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या हैदराबादने विजेतेपद जिंकले आहे. जर या योगायोगावर विश्वास ठेवला तर पुणे सुपरजाएंटसाठी ही खुशखबर आहे.
प्लेऑफमध्ये दोन क्वॉलीफायर आणि एक ऐलेमिनेटर सामना खेळला जाईल. पहिला क्वॉलीफायर अव्वल दोन संघामध्ये खेळला जाईल. मुबंईने 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून 20 गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. दूसऱ्या स्थानावर पुणे आहे. पुणे संघाने 14 सामन्यांपैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 अंक मिळवले आहेत.
"करो या मरो"च्या सामन्यात पुणे संघाने किंग्स इलेव्हन पंजाबवर मात करून प्लेऑफसाठी आपली दावेदारी पक्की केली. पहिल्या क्वॉलीफायर मुकाबल्यासाठी मुंबई आणि पुणे आज मुंबईच्या वानखेडेवर भिडतील. या सामन्यात जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये जाईल तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. पराभूत संघ ऐलिमिनेटर सामना जिंकणाऱ्या संघाबरोबर दूसरा क्वॉलीफायर सामना खेळेल.
अंकतालिकेतील तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघात ऐलिमिनेटर सामना खेळला जाईल. विद्यमान विजेता हैदरबाद तिसऱ्या तर कोलकाता चौथ्या स्थानावर आहेत. हैदराबादने 14 सामन्यांपैकी 8 जिंकून 17 अंक मिळवले आहेत. बंगळुरूसोबतचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघाना 1-1 गुण देण्यात आला होता.
कोलकाताने 14 सामन्यात 8 विजय मिळवून 16 गुणांसह पहिल्या चार संघात प्रवेश केला आहे. दोन्ही संघ 17 मे रोजी बंगळुरूमध्ये ऐलिमिनेटर सामना खेळेल. हा सामना जिंकणारा संघ 19 मे राजी दुसरा क्वॉलीफायर खेळेल. फायनल 21 मे रोजी हैदराबाद येथे होणार आहे.

Web Title: ... then the title of the IPL - 10 "Pune team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.