आमच्यासाठी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियात फरक नाही - विराट कोहली

By Admin | Published: February 22, 2017 01:41 PM2017-02-22T13:41:12+5:302017-02-22T13:43:30+5:30

कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला संघ ऑस्ट्रेलियाकडे कोणताही विशेष संघ म्हणून पाहत नसल्याचं म्हटलं आहे

There is no difference between Bangladesh and Australia - Virat Kohli | आमच्यासाठी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियात फरक नाही - विराट कोहली

आमच्यासाठी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियात फरक नाही - विराट कोहली

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - गुरुवारपासून सुरु होणा-या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला संघ ऑस्ट्रेलियाकडे कोणताही विशेष संघ म्हणून पाहत नसल्याचं म्हटलं आहे. 'ज्याप्रकारे आपण दुस-या संघाविरोधातील सामन्यांच्या आधी तयारी करतो, त्याचप्रमाणे आम्ही या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहोत. आम्ही नेहमी विरोधी संघाच्या भक्कम आणि कमकुवत बाजूंवर चर्चा करुन त्याप्रमाणे प्लान आखतो. यावेळीदेखील आम्ही असंच करत असून यामध्ये काही नवीन नाही', असं विराट कोहली बोलला आहे. 
 
गुरुवारी सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी आज आयोजित पत्रकार परिषदेत विराट कोहलीने सांगितलं की, 'आपल्यासाठी प्रत्येक सामना एक आव्हान असून, प्रत्येक मालिका आव्हानात्मक असते. ऑस्ट्रेलियासंबंधी आम्ही काही विशेष चिंता नाही करत आहोत. आम्ही विरोधी संघाचा आदर करतो, पण आम्ही आमच्या खेळण्याच्या क्षमतेवर आणि खेळावर लक्ष केंद्रित करतो. आमचं लक्ष ऑस्टेलिया संघावर नाही ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. ज्याप्रमाणे दुस-या संघांविरोधात खेळण्याआधी आम्ही तयारी करतो तशीच तयारी आत्ता करत आहोत'.
 
आपल्या खेळावर आणि कर्णधारपदाशी संबंधित प्रश्नांवर बोलताना विराटने सांगितलं की, 'मी प्रत्येक मालिकेनंतर स्वत:ला पारखत बसत नाही. देशासाठी खेळणं आणि जिंकणं माझी प्राथमिकत आहे. मी दरवेळी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये प्रशिक्षक अनिल कुंबळे महत्वाची भूमिका निभावतात. कर्णधाराचा प्रश्न येतो तेव्हा ती संघावर अवलंबून असते. संघाच्या कामगिरीवर कर्णधाराची यशस्वी कारकिर्द ठरते'.
 
प्रसारमाध्यमांशी संबंधित प्रश्नावर बोलताना विराटने ,'माझं लक्ष फक्त खेळावर आहे. लोक लिहितात आणि बोलतात, लोक स्तुतीही करतात आणि नंतर टीकाही करतात. यावर माझं नियंत्रण असू शकत नाही', असं म्हटलं आहे. 'मी जेव्हा 22 वर्षांचा होतो तेव्हा मी 35 वर्षांच्या खेळाडूप्रमाणे खेळावं अशी लोकांची अपेक्षा होती. पण आता माझा माझ्या खेळावर विश्वास आहे', असं विराट बोलला आहे.
 

Web Title: There is no difference between Bangladesh and Australia - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.