लोढा शिफारशींवर चर्चा नाही
By admin | Published: January 23, 2016 03:50 AM2016-01-23T03:50:39+5:302016-01-23T03:50:39+5:30
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींवर कोणतीही चर्चा वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झाली नसल्याचे शुक्रवारी मुंबई क्रिकेट
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींवर कोणतीही चर्चा वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झाली नसल्याचे शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) उपाध्यक्ष आशिष शेलार म्हणाले.
बैठकीनंतर शेलार यांनी सांगितले, यावेळी लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा झाली नाही. याबाबतच्या आमच्या शिफारशी आम्ही बीसीसीआयकडे पाठवल्या असून आम्हाला त्यांच्या उत्तरांची प्रतीक्षा आहे. तसेच लोढा समितीच्या कारभारातील पारदर्शकपणा व जबाबदारीपणा या शिफारशीना आमची सहमती आहे. मात्र काही मुद्दे लागू करणे कठीण असून याबाबतीत आम्ही आमचा विचार बीसीसीआयकडे मांडू, असेही शेलार यांनी सांगितले. यासह वानखेडे स्टेडियम आवारात पाच वर्षांची प्रवेश बंदी उठवलेल्या केकेआरचा मालक व अभिनेता शाहरुख खान प्रकरणाचा तपशील मागितल्याचेही शेलार यांनी सांगितले.