भविष्यात खूप पुढचा विचार करण्यावर विश्वास नाही - रहाणे
By admin | Published: September 2, 2016 10:48 PM2016-09-02T22:48:08+5:302016-09-02T22:48:08+5:30
भारताच्या १३ कसोटीच्या आगामी व्यस्त दौºयात निर्णायक भूमिका बजावण्याची आशा असणाºया अजिंक्य रहाणेने मानसिकतेवर प्रभाव होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात खूप पुढचा विचार करू इच्छित नसल्याचे सांगितले
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भारताच्या १३ कसोटीच्या आगामी व्यस्त दौºयात निर्णायक भूमिका बजावण्याची आशा असणाºया अजिंक्य रहाणेने मानसिकतेवर प्रभाव होऊ शकतो, त्यामुळे भविष्यात खूप पुढचा विचार करू इच्छित नसल्याचे सांगितले. रहाणे म्हणाला, ‘‘आमच्या समोर एक काम आहे हे मला माहीत आहे; परंतु मी कधीही लक्ष्य निश्चित करीत नाही. खूप पुढचा विचार करण्याने आपल्या मानसिकतेवर प्रभाव पडू शकतो. त्याऐवजी मी प्रत्येक वेळेस एकाच दिवसाविषयी विचार करतो. सध्या माझे लक्ष हे न्यूझीलंड मालिकेवर आहे.’’
रहाणेने नेहमीच एखाद्या विशेष संघाविरुद्ध होमवर्क करण्यावर भर दिला आहे आणि या महिन्यात जेव्हा न्यूझीलंडचा संघ तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येईल तेव्हाही परिस्थिती वेगळी असणार नाही. रहाणे म्हणाला, ‘‘मी नेहमीच आपल्या फलंदाजीविषयी आपले प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याशी चर्चा करतो. या वेळेसही परिस्थिती वेगळी असणार नाही. तथापि, निश्चितच प्रत्येक मालिकेसाठी वेगळी तयारी असते. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही नेहमीच प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तीन पावले पुढे असावे.’’ रहाणेने न्यूझीलंडचे आक्रमण चांगले असल्याचे म्हटले. या स्टार फलंदाजाने म्हटले, ‘‘त्यांचे गोलंदाजी आक्रमण चांगले आहे. त्यांच्याकडे ट्रेंट बोल्ट, मिच सेंटनर आणि ईश सोढीसारखा चांगला फिरकी गोलंदाजदेखील आहे. तथापि, आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.’’ वेगवेगळ्या वजनाच्या बॅटचा उपयोग करण्याविषयी रहाणे म्हणाला, ‘‘आपण नेहमीच सारख्या वजनाच्या बॅटचा उपयोग करतो.’’
तो म्हणाला, ‘‘मेलबर्न असो अथवा मुंबई मी कधीही आपल्या बॅटच्या वजनाशी छेडछाड करीत नाही. जगभरातील खेळपट्ट्यांच्या वेगवेगळ्या बाऊन्सनंतरही त्यात बदल करीत नाही.’’ रहाणेने वेस्ट इंडीजमध्ये नुकत्याच झालेल्या मालिकेत एक शतक व एका अर्धशतकासह २४३ धावा केल्या होत्या. तो म्हणाला, मी नेहमीच प्रगती करण्याचा प्रयत्न करतो आणि कॅरेबियन भूमीवरील कामगिरीने मी समाधानी आहे. विशेषत: ड्यूकच्या लाल चेंडूवर खेळण्याची तयारी केली आहे. लाल ड्यूक चेंडूने खेळणे आणि कुकाबुराने खेळणे वेगवेगळे असते, कारण अन्यच्या तुलनेत चेंडू जास्त सीम आणि स्विंग होतो. त्यासाठी तुम्हाला शरीराजवळ आणि जितके शक्य आहे तितके उशिरा खेळावे लागते. मी माझ्या खेळावर खुश आहे. जर आम्ही ३-0 ने विजय मिळवला असता, तर ते शानदार ठरले असते; परंतु तुम्ही हवामानावर नियंत्रण ठेवू शकत नाही.’’ रहाणेने मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात असलेला जोश याची बरोबरी केली जाऊ शकत नाही याविषयी सहमती दर्शवली. तो म्हणाला, ‘‘त्यांच्याजवळ खूप चांगली माहिती आहे. जवळपास आठ वर्षांआधी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले आहे; परंतु काही बदलले असे वाटत नाही. त्यांच्यात असणारा जोश याची बरोबरी केली जाऊ शकत नाही. प्रत्येक मिनिटाला होणाºया बाबीवर त्यांचे लक्ष असते. मी चांगला खेळत आहे आणि कामगिरीत सातत्यासाठी बेसिक्सवर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.’’