टेनिस स्पर्धांसाठी शासकीय निधी नाही : क्रीडा मंत्रालय
By admin | Published: April 28, 2017 02:06 AM2017-04-28T02:06:57+5:302017-04-28T02:06:57+5:30
स्पर्धा आयोजनासाठी निधी जमविणे, ही महासंघाची जबाबदारी असून केंद्र सरकार आयोजनासाठी निधी उपलब्ध करू शकत
Next
नवी दिल्ली : स्पर्धा आयोजनासाठी निधी जमविणे, ही महासंघाची जबाबदारी असून केंद्र सरकार आयोजनासाठी निधी उपलब्ध करू शकत नसल्याचे क्रीडा मंत्रालयाने अखिल भारतीय टेनिस महासंघाला (एआयटीए) कळविले आहे.
शासकीय मदतीतून ४४ आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाची एआयटीएची योजना होती. शासनाने मदत नाकारताच त्यांच्या आशेवर पाणी पडले. भारतीय टेनिस कॅलेंडरमध्ये एटीपी चॅलेंजरचा समावेश नसल्याने खेळाडूंना रँकिंग गुण व आर्थिक कमाईसाठी मदत होत नाही. भारताने २०१५मध्ये ४ स्पर्धांचे आयोजन केले. २०१६मध्ये केवळ २ चॅलेंजर्सचे आयोजन करण्यात आले होते. यंदा चार महिने आटोपले, तरी एकही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नाही.