कुंबळे-कोहली वादाबाबत काहीच कल्पना नाही : चौधरी

By admin | Published: June 2, 2017 01:01 AM2017-06-02T01:01:50+5:302017-06-02T01:01:50+5:30

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वादाची मला काहीच कल्पना नसून

There is no idea about Kumble-Kohli controversy: Chaudhary | कुंबळे-कोहली वादाबाबत काहीच कल्पना नाही : चौधरी

कुंबळे-कोहली वादाबाबत काहीच कल्पना नाही : चौधरी

Next

बर्मिंगहॅम : भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वादाची मला काहीच कल्पना नसून हे सर्व काल्पनिक आहे, असे मला वाटते, असे स्पष्ट मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांनी व्यक्त केले.
चौधरी यांनी सांगितले, की ‘मला या प्रकरणाची काहीच माहिती नाही. हे पूर्णपणे काल्पनिक आहे.’ चौधरी सध्या बर्मिंगहॅम येथे आले असून येथे येण्याबाबत त्यांचे काहीच वेळापत्रक नव्हते. याबाबत विचारले असता, ते म्हणाला की, ‘माझ्या कार्यक्रमाची किंवा वेळापत्रकाची माहिती तुम्हाला अधिक माहित आहे, याचे आश्चर्य वाटते.’ त्यांनी प्रशिक्षकपदाच्या निवडीबाबत पुढे म्हणाले, की ‘कुंबळे यांचा कार्यकाळ १८ जूनला समाप्त होत असल्याने बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. बीसीसीआय केवळ एक प्रक्रीया करीत आहे.’ (वृत्तसंस्था)

वीरेंद्र सेहवाग व मुडी यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी केले अर्ज

नवी दिल्ली : दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे. कुंबळे यांना प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी व इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या शर्यतीत सेहवाग सामील झाल्यामुळे लढतीला रंगत आली आहे. सेहवागला प्रशिक्षणाचा कुठलाही अनुभव नाही, पण किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मेंटर होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने त्याला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे.

Web Title: There is no idea about Kumble-Kohli controversy: Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.