दडपण बाळगण्याची गरज नाही : तेंडुलकर

By admin | Published: February 24, 2015 12:00 AM2015-02-24T00:00:50+5:302015-02-24T00:00:50+5:30

सराव सत्रातून ‘ब्रेक’ घेण्याच्या भारतीय संघाच्या रणनीतीवर अनेकांनी टीका केली असली तरी सचिन तेंडुलकरने मात्र महेंद्रसिंह धोनीच्या

There is no need to bowl: Tendulkar | दडपण बाळगण्याची गरज नाही : तेंडुलकर

दडपण बाळगण्याची गरज नाही : तेंडुलकर

Next

पर्थ : सराव सत्रातून ‘ब्रेक’ घेण्याच्या भारतीय संघाच्या रणनीतीवर अनेकांनी टीका केली असली तरी सचिन तेंडुलकरने मात्र महेंद्रसिंह धोनीच्या निर्णयाची पाठराखण केली. ऊर्जा राखून ठेवणे व अतिरिक्त सराव याचे योग्य संतुलन साधणे आवश्यक आहे.
सचिन म्हणाला, यश मिळविण्यासाठी समतोल राखणे आवश्यक आहे. धोनीने नेहमी सराव व फिटनेस याबाबत संतुलन राखण्याची पाठराखण केली असून सचिननेही त्याच्या सुरात सूर मिसळला. जर एखादा खेळाडू अपयशी ठरत असेल तर त्याला अतिरिक्त सराव करण्याची गरज असते, पण सर्व काही सुरळीत असेल तर ऊर्जा राखून सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. टी-२० क्रिकेटमुळे आणि क्षेत्ररक्षणामध्ये नवे नियम लागू झाल्यामुळे आता ९ धावांपेक्षा अधिक सरासरीची गरज असली तरी लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य आहे.’’
सचिन म्हणाला, ‘‘मोठ्या धावसंख्येच्या लढती होण्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण नियमांमध्ये झालेला बदल. त्यात सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक कमी असतो. त्यामुळे गोलंदाजांना वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागते. त्याचा मोठा फरक पडतो. दुसरे कारण टी-२० क्रिकेट आहे. त्यात फलंदाजांना जोखीम पत्करत नवे फटके खेळण्याची संधी मिळते. त्याचा नेटस्मध्ये अधिक सराव केला जातो.’’ आता प्रतिषटक ८ धावांच्या सरासरीने धावा फटकाविल्या जात आहेत. टी-२०मध्ये तर ९ पेक्षा अधिकच्या सरासरीने लक्ष्याचा पाठलाग केला जातो.

Web Title: There is no need to bowl: Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.