खेळाडूंच्या आचारसंहितेत बदलाची योजना नाही

By admin | Published: August 9, 2014 12:32 AM2014-08-09T00:32:34+5:302014-08-09T00:32:34+5:30

खेळाडूंच्या आचारसंहितेमध्ये कुठलाच बदल करण्याबाबत विचार नसल्याचे आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.

There is no plan to change the code of the players | खेळाडूंच्या आचारसंहितेत बदलाची योजना नाही

खेळाडूंच्या आचारसंहितेत बदलाची योजना नाही

Next
>चेन्नई : खेळाडूंच्या आचारसंहितेमध्ये कुठलाच बदल करण्याबाबत विचार नसल्याचे आयसीसीचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले. जेम्स अॅन्डरसन-रवींद्र जडेजा यांच्यामधील वादानंतर सध्या आचारसंहिता बदल हा चर्चेचा मुद्दा आहे.
श्रीनिवासन म्हणाले, ‘‘खेळाडूंच्या आचारसंहितेत सुधारणा करण्याबाबत आम्ही कुठलाही विचार केलेला नाही.’’ बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी गुरुवारी खेळाडूंच्या आचारसंहितेमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया लगेच दुस:याच दिवशी आली. 
पटेल यांनी म्हटले होते की, माङया मते आयसीसीच्या आचारसंहितेत बदल करायला पाहिजे. सध्या बीसीसीआयला न्यायिक आयुक्ताच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येणार नाही. या प्रकरणात केवळ आयसीसीला अपील करण्याचा अधिकार आहे. ही या प्रक्रियेमधील उणीव आहे. दरम्यान, राहुल द्रविडने धक्का प्रकरणात अॅण्डरसनला निदरेष ठरविल्यामुळे टीका केली आहे. द्रविडने म्हटले की, क्रिकेट प्रशासकांनी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाला निदरेष सोडल्यामुळे ‘चुकीचा संदेश’ गेला. या प्रकरणात अॅण्डरसनवर कारवाई होणो आवश्यक होते. (वृत्तसंस्था) 

Web Title: There is no plan to change the code of the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.