माझ्या सराव पद्धतीत कुठलीच उणीव नाही : युकी
By admin | Published: April 4, 2017 12:28 AM2017-04-04T00:28:22+5:302017-04-04T00:28:22+5:30
भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरीने सरावाच्या पद्धतीमध्ये कुठली उणीव नसल्याचे स्पष्ट केले.
नवी दिल्ली : दुखापतीमुळे डेव्हिस कप लढतीतून बाहेर झालेला भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू युकी भांबरीने सरावाच्या पद्धतीमध्ये कुठली उणीव नसल्याचे स्पष्ट केले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे युकीने सात एप्रिलपासून उज्बेकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीतून माघार घेतली आहे.
युकीची कारकीर्द दुखापतीमुळे गाजली आहे. त्याला व्यावसायिक टेनिसमध्ये आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही. यंदा त्याने चेन्नई ओपनसाठी पात्रता मिळवली होती आणि चीनमध्ये दोन चॅलेंजर पातळीच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला डेव्हिस कप एशिया ओशियाना गटातील लढतीत खेळता येणार नाही.
युकीने चमकदार पुनरागमनाची आशा व्यक्त करताना सांगितले की, ‘दुखापत गंभीर नाही, पण चुकीच्या वेळी उद््भवली आहे. मी या महिन्याचे अखेर पुनरागमन करणार आहे.’
युकीच्या अनुपस्थितीचा संघाच्या संयोजनावर परिणाम होणार आहे. नॉन प्लेइंग कर्णधार महेश भूपतीला आता लिएंडर पेस किंवा रोहण बोपन्ना यांच्यापैकी एकाचा संघात समावेश करावा लागणार आहे.
कर्णधार भूपतीने खेळाडूंसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यातील एक नियम म्हणजे ‘सर्वंच खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्यापूर्वी फिटनेस सिद्ध करवा लागणार आहे.’
फिटनेस चाचणी दिली का, याबाबत बोलताना युकी म्हणाला, ‘मला फिटनेस चाचणी द्यायची होती, पण मी खेळू शकणार नाही, याची मला कल्पना आली होती. पुढच्या लढतीपर्यंत फिट होईल आणि चाचणीला सामोरे जाईल.’
भूपतीच्या नेतृत्वाखाली खेळल्याशिवाय त्याच्याबाबत वक्तव्य करणे चुकीचे ठरेल. प्रत्येक कर्णधाराची शैली वेगळी होती. आनंद अमृतराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यात मला आनंद मिळाला. (वृत्तसंस्था)
महेशबाबतही सर्व चांगलेच घडेल. फिटनेस चाचणीमध्ये कुठली अडचण नाही. संघासाठी ते फायद्याचे आहे.’ (वृत्तसंस्था)
>दुखापतीमुळे संघाबाहेर राहणे मला आवडत नाही. माझ्या सरावामध्ये कुठली उणीव नाही, पण अनेकदा परिस्थितीवर आपले नियंत्रण नसते. - युकी भांबरी