तिसरा एकदिवसीय सामना : भारताचा विजयी आघाडीचा निर्धार

By admin | Published: June 29, 2017 08:24 PM2017-06-29T20:24:33+5:302017-06-29T20:33:05+5:30

तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे.

Third ODI: The determination of India's winning lead | तिसरा एकदिवसीय सामना : भारताचा विजयी आघाडीचा निर्धार

तिसरा एकदिवसीय सामना : भारताचा विजयी आघाडीचा निर्धार

Next

ऑनलाइन लोकमत

अँटिग्वॉ, दि. 29 - आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३०पासून खेळला जाईल.

पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला तर पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या तीन आघाडीच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील अचूक मारा करीत वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळवून दिला होता. भारताने ५ बाद ३१० धावा उभारल्या पण त्यात धोनी आणि युवराजचे योगदान नव्हते. तिसऱ्या सामन्यात या दोघांकडून धावांची अपेक्षा असेल. युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्या उपस्थितीमुळे फलंदाजी आणखी भक्कम मानली जाते. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन हा देखील चांगली फलंदाजी करू शकतो.

गोलंदाजीचा भार भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असून फिरकीची जबाबदारी अश्विनसोबत कुलदीप यादव सांभाळणार आहे. कुलदीपने दुसऱ्या सामन्यात ५० धावांत तीन गडी बाद केले होते. रवींद्र जडेजाचा संघात समावेश
होतो का, हे पाहणे रंजक ठरेल. कोहली, युवी, धवन आणि पंड्या यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला नेट आणि जिममध्ये चांगलाच घाम गाळला. भारत येथे कमकुवत संघाविरुद्ध खेळत असला तरी श्रीलंका आणि द. आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीने हा अनुभव सकारात्मक ठरणार आहे.
मालिकेत ०-१ ने माघारल्यानंतर विंडीजने केली होप आणि सुनील एम्ब्रिस यांना जोनाथन कार्टर आणि केसरिक विलियम्स यांच्याऐवजी स्थान दिले. या दोन्ही खेळाडूंकडून यजमान संघाला बऱ्याच आशा आहेत. विंडीज संघ पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळविण्यात अपयशी ठरला होता.

उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, उमेश यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, रिषभ पंत.
वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बीशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, जेसन मोहम्मद, अ‍ॅश्ले नर्स, कीरोन पॉवेल, रोवमॅन पॉवेल.

Web Title: Third ODI: The determination of India's winning lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.