तीस मजूर जखमी; चार गंभीर

By admin | Published: August 1, 2014 02:07 AM2014-08-01T02:07:37+5:302014-08-01T02:20:12+5:30

वालसावंगी-पारध मार्गावरील घटना : बुलडाणा जिल्ह्यातील शेतमजूर घेऊन जाणार्‍या मेटॅडोरला अपघात

Thirty laborers injured; Four serious | तीस मजूर जखमी; चार गंभीर

तीस मजूर जखमी; चार गंभीर

Next

धाड : जालना जिल्ह्यातील वालसावंगी ते पारध दरम्यान आज सकाळी ९.३0 वाजता वालसावंगीकडून आन्वाकडे शेतमजूर घेऊन जाणारा मॅटेडोर रस्त्यालगतच्या खड्डय़ात पलटी झाला. यात मॅटेडोरमधील ३0 शेतमजूर जखमी झाले. सर्व जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चार जणांना गंभीर अवस्थेत औरंगाबाद येथे हलविण्यात आले.
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील अशोक बोरमळे यांच्या मालकीचा एमएच २१ एक्स् ४३६३ क्रमांकाचा मॅटेडोर आज सकाळी वालसावंगी येथील शेतमजुरांना घेऊन आन्वा या गावाकडे शेतीच्या कामासाठी जात होते. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील धाडपासून १८ किमी अंतरावर असलेल्या वालसावंगी ते पारध या मार्गावर चालक फकिरा सोनुने यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन रस्त्यालगतच्या खड्डय़ात पलटी झाले.
या अपघातात मॅटेडोरमधील वालसावंगी येथील ३0 शेतमजूर जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र यातील चार जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने औरंगाबाद येथे उपचारार्थ हलविण्यात आले. याप्रकरणी अपघाताची नोंद भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
*औरंगाबादला हलविले
या अपघातात सुमनाबाई वाघ, आकाश वाघ, क्रि ष्णा खरात आणि वाहनचालक फकिरा सोनुने यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन तत्काळ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. 

Web Title: Thirty laborers injured; Four serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.