Thomas Cup : भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 03:17 PM2022-05-15T15:17:54+5:302022-05-15T15:23:51+5:30

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी  ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस  चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक....

Thomas Cup : India beat 14-time champions Indonesia 3-0 to win a historic first Thomas Cup in the 73 year history of the tournament | Thomas Cup : भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

Thomas Cup : भारताची ऐतिहासिक कामगिरी, ७३ वर्षांत थॉमस चषक स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक

googlenewsNext

Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी  ऐतिहासिक कामगिरी केली. थॉमस  चषक स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात भारतीय पुरुष संघाने प्रथमच पदक पटकावले आणि तेही सुवर्णपदक.... ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर विजय मिळवून भारतीय पुरुष संघाने इतिहास घडवला. थॉमक चषक स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारताने उपांत्य फेरीत डेन्मार्कवर ३-२ असा थरारक विजय मिळवला होता, तत्पूर्वी त्यांनी मलेशियावर मात केली होती. उपांत्य फेरीत प्रवेश करताना भारताने कांस्यपदक  पक्के केले होते, परंतु त्यांनी थेट सुवर्णपदकावर नाव कोरले. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.

आज झालेल्या अंतिम सामन्यात भारतासमोर तगड्या इंडोनेशियाचे आव्हान होते. इंडोनेशियाच्या पुरुष संघाने सर्वाधिक १४ वेळा थॉमस चषक उंचावला आहे. पण, भारतीय खेळाडूंच्या मजबूत निर्धारासमोर त्यांनी हार मानली. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ( Lakshya Sen) कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर लक्ष्यने दमदार पुनरागमन केले. ७-१२ अशा पिछाडीवरून लक्ष्यने दुसऱ्या गेममध्ये कमबॅक करताना २१-१७ अशी बाजी मारली आणि त्यानंतर निर्णायक गेममध्ये २१-१६ असा विजय मिळवून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.  

दुहेरीत सात्विकराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांच्या विरुद्धचा दुसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला. पण, भारतीय जोडी वरचढ ठरली. सात्विक व चिराग यांनी हा सेट १८-२१, २३-२१, २१-१९ असा जिंकून भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. 


आता उर्वरित तीन सामन्यांत भारताला एक विजय पुरेसा होता, तर इंडोनेशियाला तीन... त्यामुळे सर्वांचे लक्ष्य एकेरीच्या लढतीत स्टार किदम्बी श्रीकांत याच्यावर लागले. श्रीकांतचा सामना जोनाथन ख्रिस्टी याच्याशी होता, परंतु श्रीकांतने पहिला गेम २१-१३ असा जिंकून प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण केले. मात्र, इंडोनेशियाच्या खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये चिवट झुंज दिली. ८-१२ अशा पिछाडीवरून त्याने १६-१३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर गेम १८-१८ असा आणखी चुरशीचा बनला. ख्रिस्तीने २०-१९ अशी आघाडी घेत गेम पॉईंट मिळवला, पंरतु श्रीकांतने २०-२० अशी बरोबरी घेतली. २२-२१ अशी आघाडी घेत श्रीकांतने गेम पॉईंट मिळवला आणि २३-२१ असा विजय मिळवून इतिहास घडवला. भारताने ३-० अशा फरकाने इंडोनेशियाला नमवून सुवर्णपदक नावावर केले. 

Web Title: Thomas Cup : India beat 14-time champions Indonesia 3-0 to win a historic first Thomas Cup in the 73 year history of the tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.