Thomas Cup : भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक अन् १ कोटींचं बक्षीस जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 03:56 PM2022-05-15T15:56:29+5:302022-05-15T15:59:43+5:30
Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले
Thomas Cup : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉसम चषक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले आणि त्यांनी अंतिम सामन्यात ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर ३-० असा विजय मिळवला. लक्ष्य सेन, सात्विकराज रँकीरेड्डी, चिराग शेट्टीव, किदम्बी श्रीकांत, एम आर अर्जुन, ध्रुव कपिला व एचएस प्रणॉय हे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.
This will go on for some time now 🕺🥳
— BAI Media (@BAI_Media) May 15, 2022
We thank each & everyone for your support ❤️#TUC2022#ThomasCup2022#ThomasUberCups#IndiaontheRise#Badmintonpic.twitter.com/pMpKHdILaO
पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने ( Lakshya Sen) कडव्या संघर्षानंतर इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. दुहेरीत सात्विकराज रँकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांचा १८-२१, २३-२१, २१-१९ असा पराभव केला. एकेरीत स्टार किदम्बी श्रीकांतने चुरशीच्या सामन्यात जोनाथन ख्रिस्टी २१-१३, २३-२१ असा विजय मिळवून इतिहास घडवला. भारताने ३-० अशा फरकाने इंडोनेशियाला नमवून सुवर्णपदक नावावर केले.
Union Sports Minister Anurag Thakur announces a cash award of Rs 1 crore after Team India defeated the 14-time Champions, Indonesia (3-0) to win its first-ever Thomas Cup. pic.twitter.com/m4ssjLco94
— ANI (@ANI) May 15, 2022
आतापर्यंत केवळ सहाच देशांना #ThomasCup जिंकता आलेला आहे. त्यात सर्वाधिक १४ जेतेपदं इंडोनेशियाच्या ( १९५८-२०२०) नावावर आहेत. त्यानंतर चीनच्या नावावर १० ( १९८२-२०१८), मलेशियाच्या नावावर ५ ( १९४९-१९९२) आणि जपान ( २०१४), डेन्मार्क ( २०१६) व भारत ( २०२२) यांच्या नावावर प्रत्येकी १ जेतेपद आहे. भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. भारत सरकारने संघाला १ कोटींचे बक्षीस जाहीर केले.
The Indian badminton team has scripted history! The entire nation is elated by India winning the Thomas Cup! Congratulations to our accomplished team and best wishes to them for their future endeavours. This win will motivate so many upcoming sportspersons.
— Narendra Modi (@narendramodi) May 15, 2022