थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला; १०० मीटर शर्यत १०.५४ सेकंदात पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 05:34 AM2021-08-23T05:34:34+5:302021-08-23T05:34:34+5:30

थॉम्पसन ने शनिवारी महिलांच्य १०० मीटर शर्यतीत १०.५४ सेकंदांची वेळ नोंदवली.  हे तीचे या वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

Thompson hooked Herah's record; 100 meters race completed in 10.54 seconds | थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला; १०० मीटर शर्यत १०.५४ सेकंदात पूर्ण

थॉम्पसन हेराहचा विक्रम हुकला; १०० मीटर शर्यत १०.५४ सेकंदात पूर्ण

Next

युजीन, अमेरिका : जमैकाची धावपटू आणि टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती इलेनी थॉम्पसन हेराह हीने प्रीफोनटेन क्लासिक स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. मात्र ती फ्लोरेन्स ग्रिफीथ जॉयनर हिचा ३३ वर्षे जुना विक्रम मोडू शकली नाही. 

थॉम्पसन ने शनिवारी महिलांच्य १०० मीटर शर्यतीत १०.५४ सेकंदांची वेळ नोंदवली.  हे तीचे या वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. तीने टोकियोत १०.६१ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले होते. मात्र ती जॉयनरचा १९८८ चा १०.४९ सेकंदांचा विक्रम मोडू शकली. ऑलिम्पिकप्रमाणेच थॉम्पसननंतर जमैकाचीच शेली एन फ्रेजर प्राइस आणि शेरिका जॅक्सन दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

थॉम्पसन हेराहने सांगितले की, मी थोडी हैराण आहे. कारण गेल्या पाच वर्षात मी इतरी वेगवान धावलेली नव्हती. मी चॅम्पियनशीपमध्ये खुप वेगाने धावले. 
दोन अठवड्यात दुसऱ्यांदा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणे शानदार आहे.’

योर्डेनिस उगासने केला मॅनि पॅकियाओचा पराभव
लास वेगास : मॅनी पॅकियाओ याला शनिवारी रात्री योर्डेनिस उगास याच्याकडून निराशाजनक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याचे २६ वर्षांचे बॉक्सिंग करीयर जवळपास संपुष्टात आले आहे. 
फिलीपीन्सचा सिनेटर असलेल्या पॅकियाओला उगास याने सर्व समंतीने झालेल्या निर्णयाने पराभूत केले. त्यासोबतच उगास याने आपला डब्लुबीए वेल्टर वेट विजेतेपद कायम राखले. 
उगास याने म्हटले की तो शानदार प्रतिस्पर्धी आहे. मी देखील त्याला हे दाखवण्यासाठी आलो होतो ती मी डब्लुटीए चॅम्पियन आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल खुप आदर आहे. मात्र ही लढत मी जिंकली.’
 पॅकियाओनने म्हटले की, मी आज रात्री माझा सर्वोत्तम खेळ केला. मात्र तो पुरेसा नाही. मी विजेतेपदासाठी लढत होतो. आणि आजच्या विजेत्याचे नाव हे उगास आहे.’
निराश झालेल्या पॅकियाओने म्हटले की, त्याने अजून निर्णय घेतलेला नाही की तो पुन्हा रिंगमध्ये उतरेल की नाही. भविष्यात तुम्हाला पुन्हा मॅनी पॅकियाओ रिंगमध्ये लढतांना दिसु शकतो. 

Web Title: Thompson hooked Herah's record; 100 meters race completed in 10.54 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.